बार्शी! महात्मा फुले समता परिषद सह ओबीसी समाजातील सर्व समाज संघटना आक्रमक


बार्शी/प्रतिनिधी:

सर्वोच्च न्यायालयाने अतिरिक्त आरक्षणाच्या याचिकेवरून नागपूर , अकोला,  वाशीम नंदुरबार गोंदिया या जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती मधील ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण स्थगित केले आहे त्यामुळे ओबीसी समाजाला मिळणारे राजकीय आरक्षण धोक्यात आले असून येथून पुढे होणाऱ्या निवडणुका जशा जिल्हा परिषद , पंचायत समिती ग्रामपंचायत,  महापालिका,  नगर परिषद अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मधील आरक्षण धोक्यात येणार आहे. साडेतीन हजार पेक्षा जास्त जाती आणि पोट जाती यांनी मिळून बनलेला आर्थिक मागास प्रवर्ग म्हणजेच ओबीसी समाज या आरक्षण रद्द होण्याच्या निर्णयाने अस्वस्थ झाला असून ओबीसींना हक्काचे राजकीय आरक्षण परत मिळावे ही प्रमुख मागणी घेऊन ओबीसी समाजाची जनगणना करावी अशीही मागणी यावेळी ओबीसी समाजाच्या वतीने करण्यात आले या वेळी तहसीलदारांना विविध सामाजिक संघटनांच्या वतीने निवेदने देण्यात आली

यावेळी आंदोलनामध्ये महात्मा फुले समता परिषदेचे बार्शी शहर अध्यक्ष नितीन भोसले यांनी बोलताना सांगितले की इंग्रजांच्या काळामध्ये ओबीसी जनगणना झाली होती त्यावेळी एकूण लोकसंख्येच्या ५२ टक्के समाज हा ओबीसी समाज होता. मात्र स्वातंत्र्यानंतर ओबीसींची जनगणना झालेली नाही त्यामुळे आता असणारे २७ टक्के आरक्षण हे न्यायिक नाही आणि त्यात अजून आता ओबीसींचे राजकीय आरक्षण हिरावले जात आहे ही गंभीर बाब आहे उपेक्षित समाजाला परंतु अपेक्षित करत गावा बाहेर हाकलण्याचा हा दावा असून आता ओबीसींनी जागृत व्हावे असेही त्यांनी सांगितले यावेळी  नागजी अडसूळ, एडवोकेट वासुदेव ढगे,  तानाजी बोकेफोडे, सुनील आवघडे व इतर यांनी आपली मनोगते मांडली. भारत मुक्ती मोर्चाचे तानाजी बोकेफोडे यांनी बोलताना सांगितले की या देशांमध्ये कुत्र्याची मांजराची माकडाची मोजणी होत असेल तर ओबीसी समाजाची जनगणना का होत नाही असा प्रश्न करत सरकार कोणतेही असो ओबीसींना हमेशा अन्यायाला सामोरे जावे लागले आहे त्यामुळे आता संघर्ष हा एकमेव मार्ग असून त्याच मार्गाने ओबीसी समाजाला न्यायासाठी भांडावे लागेल. 

बार्शी तहसील कार्यालयासमोर ओबीसी समाजाच्या झालेल्या आंदोलनामध्ये महात्मा फुले समता परिषद तालुकाध्यक्ष दीपक ढगे,  शहराध्यक्ष नितीन भोसले ,सावता परिषदेचे तालुका अध्यक्ष दिनेश नाळे , सावता सेना चे अध्यक्ष पुष्कराज आगरकर,  वंजारी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष राजेश बांगर,  परीट धोबी सेवा मंडळ प्रदेश सदस्य रवी राऊत , नाभिक दुकानदार संघटनेचे महादेव वाघमारे , सुधाकर शिंदे राजू भाऊ देवकर, पांडुरंग डाके , भारत मुक्ती मोर्चाचे तानाजी बोकेफोडे , ओबीसी मोर्चा चे प्रकाश शेंडगे , अखिल भारतीय नागपंथी समाज महासंघाचे संजय चव्हाण , महात्मा फुले प्रतिष्ठान चे ऍडव्होकेट वासुदेव ढगे यांच्यासह दत्तात्रय मस्तूद  , दीपक शिंदे , आप्पा शेंडगे , माऊली नाळे,  सोमनाथ सावंत , माजी सरपंच राजेश माळी,  प्रकाश माळी अशोक माळी, मुन्ना माळी  यांच्यासह ओबीसी समाजातील जाती पोटजाती मधील नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments