नोकरीवार्ता! आरोग्य विभागात २,२२६ पदांच्या भरतीसाठी शासकीय आदेश जारी


 
कोरोनाने आरोग्य विभागाच्या त्रुटी समोर आल्या होत्या. त्यावेळी तातडीच्या सोईसुविधा आरोग्य विभागाला उपलब्ध करून देण्यात आला होत्या. त्यानंतर राज्यात आरोग्य विभागात १६ हजार पदांची तातडीनं भरती केली जाणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गेल्या महिन्यात दिली होती.

आता त्यामधील २,२२६ पदांच्या भरतीसाठी शासकीय आदेश जारी करण्यात आला आहे. राज्यातील एकूण ११८ आरोग्य संस्थांकरीता ८१२ नियमित पदे निर्माण करण्यास तसेच ११८४ कुशल मनुष्यबळ सेवा आणि २२६ अकुशल मनुष्यबळ सेवा अशी एकूण २,२२६ पदे भरुन घेण्यात येणार असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. ही भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी तातडीनं आदेश जारी करणार असल्याचंही राजेश टोपे यांनी सांगितलं होतं.

अ आणि ब वर्गातील प्रत्येकी दोन दोन हजार अशी एकूण चार हजार पदं भरली जाणार आहेत. तर क आणि ड वर्गातील १२ हजार कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे.  राज्यातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता आरोग्य विभागानं ही संपूर्ण भरती प्रक्रिया लवकरात लवकर राबावावी, अशी मागणी केली होती. मात्र, राज्याची आर्थिक स्थिती लक्षात घेता केवळ ५०%  भरती घेण्यास परवानगी देण्यात आली होती.

दरम्यान, आरोग्य अधिकारी, परिचारिका, आरोग्य सहाय्यक, औषध निर्माण अधिकारी, स्त्री आणि पुरुष परिचारक, लिपिक, कक्ष सेवक, शिपाई, वाहन चालक, सफाई कामगार या पदांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. त्यामुळे आता आरोग्य विभागावरील ताण कमी होणार आहे.


 

Post a Comment

0 Comments