✒️कु. शर्वरी रवींद्र मधाळे
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.
सुरुवातीला कोरोना विषाणू जेव्हा भारतात आला तेव्हा सगळीकडे लॉकडाऊनची चर्चा होती. बघता बघता सगळं काही बंद होत गेलं. वाहतूक ठप्प, दुकाने बंद, उद्योग / व्यवसाय, गाटी - भेटी, शिक्षण, ... सर्व काही बंद पडल आहे. जगाच्या इतिहासात पहिल्यांदाच असं काही घडल्याचं पाहायला मिळालं. त्याच कारण काय तर एक ' विषाणू'.
या लॉकडाऊनमुळे बरेचसे फायदे देखील झाले. आपण सर्व जण घरात राहिल्यामुळे कोरोनाच्या 'ब्रेक द चेन' ला मदत झाली. लोक घराबाहेर नपडल्याने आपघाताचे प्रमाण 0% झाले. गर्दीची ठिकाणे बंद असल्यामुळे ईतर संसर्गजन्य व संपर्कजन्य आजारांना आळा बसला. समुद्रकिनारे व जंगले माणसांच्या हस्तक्षेप नझाल्याने स्वच्छ / सुंदर दिसू लागली आहेत. पशू - पक्षी मुक्त विहार करताना दिसत आहेत. कारखाने, उद्योग समूह ठप्प असल्याने तयार होणारं सांडपाणी नदी, समुद्रात नसोडल्याने पाणी स्वच्छ राहिले व जलचरांचे आस्तित्व कायम राहिले. जलप्रदूषण टळले. या सगळ्यामुळे पर्यावरणाची हानी मोठ्या प्रमाणात कमी झाली.
या धकाधकीच्या जीवनातून प्रत्येकाला थोडी सुट्टी हवी होती. तेच तेच चालेल रूटीन यातून थोडा ब्रेक हवा होता. लॉकडाऊन मुळे तो मिळाला देखील. सगळे घरी असल्याने काहीसे दुरावलेले नाते संबंध पुन्हा जुळव्यास मदत झाली रुसवे - फुगवे, भांडणे सगळं काही या कोरोनाने विसरायला लावलं. पण दिवसभर घरात बसून करणार तरी काय? हा प्रश्न सर्वानाच पडलेला. सगळे घरी असल्याने घरकामे वाढली. मग हळूहळू सर्वच जण घरातील कर्त्या स्त्रीला मदत करू लागले. घरातील बरीच कामं पुरुष मंडळी शिकू लागले. त्यात मग झाडून काढणे, फरशी पुसणे, कपडे घडी करून ठेवणे, भांडी जाग्यावर लावून देणे आणि विशेष म्हणजे स्वयंपाक बनविण्यात मदत करण आश्या बऱ्याच गोष्टी या लॉकडाऊन मुळे शिकल्या गेल्या. ज्या मुलींना जेवणातला ज पण येत नव्हता त्या आत्ता उत्तम जेवण बनवू लागल्या.
समाजामध्ये जो काही स्त्री - पुरुष असा भेद होता तो या विषाणूमुळे बराचसा कमी झालेला पहावयास मिळतोय. अमुक एक गोष्ट पुरुषांनी करायची स्त्रियांनी नाही याचं प्रमाण कमी झालं. घरकाम ही स्त्रियांची मक्तेदारी राहिली नाही. पुरुषमंडळी आनंदाने घरकाम करू लागली व स्त्रिया देखील उत्साहाने वर्क फ्रॉम होम करू लागल्या.
लॉकडाऊनमुळे स्वतःकडे बघायला वेळ मिळाला. काही हरवत चाललेल्या गोष्टींची पुनः नव्याने ओळख झाली. घरातील आई जी नेहमी किचनमध्ये गुंतलेली असायची तिला थोडा आराम मिळाला, तिला मोबाईल हाताळता येत नव्हता आता ती ऑनलाईन योगा क्लास आटेंड करते. बाबा जे नेहमी ऑफिसच्या कामात गुंतलेले असायचे ते आजकाल पुस्तकं वाचताना आणि जुन्या वस्तू दुरुस्त करताना दिसत आहेत. आजकाल जेवायला सगळे एकत्र बसू लागलेत. निवांत वेळ घालवतात, मन मोकळ्या गप्पा मारल्या जातत. ऑलाईन वेगवेगळे प्रकारचे चलेंजस स्वीकारून पूर्ण केले जातात, ऑनलाईन गेम्स खेळले जातात, टिक टॉकचे व्हिडीओ बनविले जात आहेत. टी. व्ही. एकत्र पहिला जातोय. जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी पूर्वीच्या फोटोंच आलबम चाळला जातोय.
आईला सकाळी लवकर उठून डबा करण्याचं टेन्शन नाही. की बाबांना धावपळ करत ऑफिसला जाण्याची घाई नाही. शाळा - कॉलेजस् बंद असल्याने मुलांना सुदधा अभ्यास - परीक्षेच दडपण नाही. मुलांचा तर
' रोजचा डे सन डे ' झाला आहे. लॉकडाऊनमुळे जीवनशैली कशी टेन्शन फ्री झाली आहे.
" खावो पीओ और घर में ही रहो!!!"
0 Comments