सोलापूर /प्रतिनिधी:
सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाअंतर्गत असलेल्या जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक राहुल वैजिनाथ बोराडे (वय ३६, रा. विजय देशमुख नगर, विजापूर रोड सोलापूर) यांचे निधन झाले. कोरोनानंतर फुफ्फुसातील संसर्ग वाढल्याने निधन झाले.
राहूल बोराडे यांच्या निधनाने सोलापूर पोलीस दलात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, वहिनी असा परिवार आहे. काही दिवसांपूर्वी ते सोलापूर पोलीस आयुक्तालय बदली होऊन होऊन आले, अवघ्या ३६ व्या वर्षी उमद्या पोलिस अधिकाऱ्याचं निधन झाल्यामुळे सोलापूर पोलीस दलात शोककळा पसरली आहे.
0 Comments