सोलापूर! जिल्ह्यातील गंभीर आजार असणाऱ्या बालकांची होणार तपासणी, बालकांच्या पालकाचे लसीकरण होणार


सोलापूर/प्रतिनिधी:

राज्यासह जिल्ह्यामध्ये कोरोना दुसऱ्या लाटेचे परिणाम झाला आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये दुसऱ्याला लाटे मध्ये लहान मुलांना कोरोना ची लागण झाली होती.  त्यातच तिसऱ्या संभाव्य लाटेमध्ये लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील कुपोषित व गंभीर आजारी असणाऱ्या बालकांच्या पालकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण कार्यक्रमात प्राधान्य देण्याची
निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली आहे.

बालकांच्या पालकांची लसीकरण होणार

कोरोना च्या दुसऱ्या लाटेने सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये मोठा धुमाकूळ घातला होता. या लाटेमध्ये वयोवृद्ध नागरिकांसह लहान मुलांनाही कोरोनाची लागण झाली होती. दुसऱ्या लाटेत सुमारे १२ टक्के बालके बाधित झाली आहेत. त्यामुळे तिसऱ्या संभाव्य लाटेमुळे जिल्ह्यातील कुपोषणग्रस्त व दुर्धर आजाराने बालकांना लागण होऊ नये म्हणून त्यांच्या पाल पालकांना कोरोना लसीकरणामध्ये देण्याबाबत प्राधान्य द्यावे असे आदेश जिल्हा परिषदेकडून काढण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील बालकांच्या आरोग्याची तपासणी होणार
सोलापूर जिल्ह्यामध्ये तिसरा लाटे तील कोरोना च्या 
प्रादुर्भावाची होऊ नये यासाठी जिल्हा परिषदेकडून जिल्ह्यातील झिरो ते अठरा वयोगटातील मुलांचे आरोग्य तपासण्याच मोहीम सुरू करण्यात आली आहे, या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील बालकांची तपासणी करून गंभीर स्वरूपाच्या आजार असणाऱ्या बालकांची यादी तयार केली जाणार आहे. तालुका आरोग्य अधिकाऱ्यांन अशा बालकांची यादी तयार करून घेतली जाणार आहे. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे लसीकरण करून घेण्याची जबाबदारी असणार आहे. त्यामुळे त्या बालकांना पालकांपासून होणारा कोरोनाचा धोका कमी होण्यास मदत होईल.

Post a Comment

0 Comments