✒️लेखक – के सुधा
गार्गी म्हटल की विद्वान, विदुषी येते डोळ्यांसमोर आणि खरच मी पाहिलेली तशीच आहे हुशार, आणि उच्चविद्याविभूषित. खरतर अगदी अचानक ओळख झाली तिची आणि माझी. (आता मी तिचा उल्लेख गार्गी असाच करेन.) मग थोड थोड बोलायला लागलो तिला जाणून घेण्याचा प्रयत्न करायला लागले. गार्गीच्या जवळच्या माणसांकडून तिच्याबद्दल ऐकल्यावर तर माझी उत्सुकता कमालीची वाढली. ती खूप अबोल आहे शांत आहे अस ऐकल पण तिच्याशी बोलताना तस कुठच नाही जाणवल. उलट खूप संयमी आणि विचारी वाटली मला गार्गी.
जन्मल्यापासून ते आतापर्यंतचा प्रवास तसा अगदी सरळ, पण प्रवास म्हटल की खाच खळगे, खड्डे बोगदो आणि वळणावळणाचा असतो. मध्ये मध्ये रस्ता अरुंद पण असतो. पण ज्याला एका विशिष्ट ध्येयाकड जायच असत तो त्याची पर्वा न करता त्या ध्येयाला नक्कीच गवसणी घालतो. आणि गार्गी न तेच केल सगळ पार करत करत आज यशाच्या शिखरावर अभिमानाने उभी आहे.आई वडिलांना गार्गी थोडी उशिरान म्हणजे मोठा भाऊ ७ ते ८ वर्षांचा साधारण असताना झाली. घरची परिस्थिती बेताची वडिलांनी किराणा मालाच दुकान चालवायला घेतलेला आणि आई शाळेत शिक्षिका. दोघा नवरा-बायकोची ओढाताण होत होती पण त्यांनी दोघांनी गार्गीला खूप जपल. त्यातल्या त्यात वडिलांनी तर खूपच काळजी घेतली आणि घेतात.
गार्गी शाळेत असल्यापासून स्कॉलराशय, गणित प्रावीण्य, प्रज्ञा ह्या सगळ्यात यशाची बाजी मारली. ह्यातच तिला दहावी आणि बारावी मध्ये पण समाधानकारक यश मिळाल. बारावी नंतर तिन सांगली मध्ये तिची BCS ची डिग्री पूर्ण केली. रोजचा प्रवास, अभ्यास आणि नैसर्गिक आपत्ती ठ्यामधूनच तिन तिच पदवी पर्यंतच शिक्षण घवघवीत यश संपादित करून पूर्ण केल. आणि त्यातच शेवटच्या वर्षी तिला विप्रो कंपनीमध्ये सिलेक्शन झाल त्यांनी तिच्या पुढच्या शिक्षणाची जबाबदारी पण घेतली. पण त्यात एक अट चार परीक्षांमध्ये एकदाही नापास व्हायच नाही.
गार्गीन ती जबाबदारी लिलया पेलली. कारण एकतर वेगळ्या शहरात सोमवार ते शुक्रवार नोकरी आणि शनिवार, रविवार कॉलेज ह्या एवढ्याच वेळेत अभ्यास करून ती चारही परीक्षा पास झाली. या काळात तिला खूप मानसिक हिंदोळ्यावरून पण कसरत करावी लागली. पण न डगमगता संयम न सुटू देता ती यशाची शिखर पादाक्रांत करत गेली. गार्गीच M.s software Engineering पूर्ण झाल.
आज गार्गी Infosys सारख्या नामांकित कंपनीमध्ये सल्लागार म्हणून कार्यरत आहे. आदर्श अशा जोडीदारासोबत तिच वैवाहिक आयुष्य बहरतय. एक चांगली मुलगी सून आणि बायको आणि बहिण अशा सगळ्या जबाबदाऱ्या तितक्याच शांतपणे ती पार पाडत आहे.
गार्गीकडे बघून एक नक्की कळत.
‘विद्या विनयेन शोभते’ आपल्या शिक्षणाचा आणि मिळालेल्या यशाचा जरासुद्धा गर्व नाही, तिला भेटल्यावर ती अगदी आपल्यासारखीच वाटली. आणि हेच तिच वेगळेपण.
0 Comments