कळंब पोलिस ठाण्याच्या हद्दीत तालुक्यातील मस्सा (खंडेश्वरी) शिवारात कडब्याच्या गंजीत दडवून ठेवलेला पांढऱ्या रंगाची प्लास्टिकचे सुमारे ४७ पोते गांजा सुमारे सव्वाकोटी रुपये किमतीचा गांजा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवार (ता.३१) धाड टाकून सायंकाळी चार वाजेच्या सुमारास पकडला. स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक पांडुरंग माने व त्यांच्या टीमने यांनी ही धाडसी कारवाही केली.
सोमवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मस्सा शिवारात कडब्याच्या गंजीत विक्री साठी गाज्यांची पोती ठेवली असल्याची गुप्त माहिती मिळाली, पोलिस अधीक्षक राजतीलक रोशन,अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक माने यांच्या टीमने मस्सा शिवारात बालाजी काळे यांनी शेतातील कडब्याच्या गंजीत दडवून ठेवलेला पांढऱ्या रंगाची प्लास्टिकची ४७ पोती ,एकुण ११३१.६६ किलोग्राम वजनाचा गांजा एकूण किंमत १ कोटी २४ लाख ५९ हजार २६० रुपये किंमतीचा गांजा पकडला आहे.
पोलिस येणार असल्याचा सुगावा लागताच बालाजी काळे व इतर तिघेजण फरार झाले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही धाडसी कारवाही केली आहे. गांज्याची पोती जप्त करून कळंब पोलिस ठाण्यात रात्री आठ वाजेच्या दरम्यान आणण्यात आली व आरोपींविरोधात एन.डी.पी.एस. कलम २०(b)(ii), २९ प्रमाणे पोस्टे कळंब गुरनं.१८७/२०२१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments