कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमध्ये तालुक्यात सर्वाधिक कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली होती. कोरोना बाधित रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी उपजिल्हा रुग्णालयात ५० बेडचे कोविड हॉस्पिटलची क्षमता असतानाही १०० ते १५० कोरोना बाधित रुग्ण उपचारासाठी दाखल करुन घेतले होते. अपुरे मनुष्यबळ असताना देखील कोरोना बाधित रुग्णांवर योग्य उपचार करण्यात आले. तसेच ऑक्सिजनची बचत करण्यासाठी ‘नॉन रिब्रीदींग मास्क’चा प्रयोग प्रथमच करण्यात आला त्यामुळे रुग्णांना आवश्यक ऑक्सिजन मिळण्याबरोबर ऑक्सिजनची बचतही मोठ्या प्रमाणात झाली असल्याची माहिती डॉ.गिराम यांनी यावेळी दिली.
उपजिल्हा रुग्णालयांत कोविड रुग्णांच्या उपचारा बरोबरच इतर आजाराच्या रुग्णांवर देखील उपचार करण्यात येत आहेत. तसेच आतापर्यत ७ हजार ९९० जणांची कोविड आरटीपीसीआर चाचणी व १६ हजारहुन अधिक संशियत व्यक्तींची रॅपिड ॲटिजेन चाचणी करण्यात आल्या आहेत. कोरोना बाधित रुग्णांवर उपचारासाठी डॉ.सचिन वाळुजकर, डॉ.शिवकमल तसेच वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी आहोरात्र उपचार केल्याचेही डॉ. गिराम यांनी सांगितले
जिल्हाशल्यचिकित्सिक डॉ.प्रदीप ढेले, प्रांताधिकारी सचिन ढोले, तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांनी कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करुन दिल्याचेही डॉ.गिराम यांनी सांगितले.
0 Comments