भाजप मोदींमुळे तर शिवसेना बाळासाहेब ठाकरेंमुळे सत्तेत : राज ठाकरे यांचं मत



भारतातील निवडणुका प्रतिकांवर होत असतात, असे रोकठोक मत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. जनतेने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना बघून शिवसेनेला तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना बघून भाजपला सत्ता दिली, असे मत राज ठाकरे मांडले आहे.

राज ठाकरे यांनी दैनिक ‘लोकसत्ते’ला मुलाखत दिली आहे. यावेळी त्यांनी देशातील निवडणूक आणि नागरिकांच्या मानसिकेतेवर भाष्य केलेले आहे. मनसे आहे म्हणून राज ठाकरे आहे. माझे तोंड आणि माझ्या सहकार्यांचे काम आहे. पक्ष म्हणून नेता ओळखला जातो. एक राजकीय पक्षाचा नेता म्हणून बघितले जाते. भारतात निवडणुका प्रतिकांवर होत असतात. लोकांनी मोदींना पाहून मतदान केले. तर बाळासाहेबांना पाहून सत्ता दिली, असे राज ठाकरे यांनी सांगितलेले आहे. देशात जो लाट निर्माण करतो तो जिंकतो. तसेच झाले. सध्या  कोरोनाच्या लाटेवर सगळे स्वार आहेत, असा चिमटा त्यांनी काढला.

निवडणुकांचा विचारच नको : कोरोना रोग आहे, पण मानसिक आजार आहे. आताच्या परिस्थितीत निवडणुकीचा विचार नको आहे. लोकांची मानसिकता निवडणुका घेण्याची नाही. समाज राहिला तर निवडणुका घेण्यात अर्थ आहे. समाजाचे मन स्थिर होणे गरजेचे आहे. हा समाज स्थिरस्थावर करण्याचा प्रयत्न करायला हवेत. नेत्यांनी समाज स्थिरस्थावर करण्यावर भर द्यावा, असे आवाहनही त्यांनी केलेले आहे. 

इतरांसारखेच वागायचे का? : आम्ही नाशिकमध्ये खूप कामे केली. 5 वर्षात एकही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही. पाणी प्रश्न मिटवला. हे चांगले आहे की वाईट? लोकांनी साथ दिली तर हुरुप येतो. लोकांना नेमके हवे काय आहे? इतरांसारखेच वागायचे का?, असा सवाल करतानाच कामाची अपेक्षा करायची आणि निवडणुकीवेळी मतदान वेगळ्याच पद्धतीने करायचे असे कसे चालणार? असे राज ठाकरे म्हणाले. 

काम करूनही पराभव : लोक कामाची अपेक्षा करतात. मतदान दुसऱ्याला करतात. त्यामुळेच वर्षानुवर्षे तेच प्रश्न राहतात. गटारी तुंबल्या, रस्ते तसेच, प्रश्न तेच, वर्षानुवर्षे तसेच सुरू राहते. समाजाने काम केले तर शाबासकी द्यावी, काम नाही करणार त्याला बाजूला करावे, हे जेव्हा घडेल तेव्हा सर्व काही व्यवस्थित होईल, असं सांगतानाच अजित पवारांनी पिंपरीत खूप मोठे काम केले, पण नशिबी काय आले, तर पराभव, असेही राज ठाकरे  म्हणाले.

महाराष्ट्राला मदत का नाही? : वादळ आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातला गेले आहे. त्यांनी गुजरातला एक हजार कोटीचे पॅकेज दिलेले आहे. महाराष्ट्र आणि गोव्याला का मदत दिली नाही? असा सवाल त्यांनी केला. केंद्र सरकारने असं वागायला नको. केंद्र आणि राज्याने हातात हात घालून काम करायला हवं, असंही ते म्हणाले. महाराष्ट्राच्या हितासाठी कोरोना काळात मुख्यमंत्र्यांना फोन केले, असे राज यांनी स्पष्ट केले आहे.

Post a Comment

0 Comments