बार्शी/प्रतिनिधी:
आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील साहेब व भाजपा जिल्हाध्यक्ष श्रीकांत दादा देशमुख यांच्या आदेशानुसार बार्शीतील पोस्ट चौक येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना म्हणालो की, राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या गलथान कारभारामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण मा. न्यायालयाच्या निर्णयाने स्थगित करण्यात आले. ओबीसी समाजाचे २७% आरक्षण होते ते जसेच्या तसे ठेवावे, अन्यथा यापुढील आंदोलन तीव्रपणे करण्यात येईल. असे निवेदन मा. तहसीलदार साहेबांना दिले.
त्याचबरोबर मराठा समाजाचे आरक्षण मा. सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले, महाविकास आघाडी सरकारने मा. न्यायालयात खंबीरपणे बाजू मांडली नाही त्यामुळेच हेही आरक्षण रद्द झाले. यामुळे भविष्यात मराठा समाजास रस्त्यांवर उतरण्याची वेळ आली आहे.
त्याचबरोबर मागासवर्गीय पदोन्नती रद्द निर्णयामुळे, आघाडी सरकारला मागासवर्गीय समाजाच्या रोषास सामोरे जावे लागत. या आंदोलनामध्ये बार्शी शहराचे नगराध्यक्ष, पंचायत समिती सभापती, नगरसेवक, महिला पदाधिकारी तसेच पक्षाचे सर्व आघाड्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदी सर्व उपस्थित होते.
0 Comments