शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्रामुळे राज्यात शिवसेना आणि भाजप यांच्यात युती होणार का, याची चर्चा रंगली असताना दुसरीकडे शिवसेनेने सर्जिकल स्ट्राइक करत भाजपच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडले.
भाजपचे विद्यमान १० नगरसेवक आणि दोन माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला.गेली काही वर्षे सातत्याने विदर्भ भाजपचा बालेकिल्ला म्हणून पुढे आला आहे.
याच विदर्भातील हिंगणघाट नगरपालिकेतील उपाध्यक्ष चंद्रकांत घुसे यांच्यासह भाजपचे विद्यमान १० नगरसेवक आणि दोन माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
0 Comments