बॉयफ्रेंडनं केली होती शरीरसुखासाठी जबरदस्ती; “या” अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा

 

अनेक वर्षांपासून लोकांचं मनोरंजन करत असलेल्या ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या सब टीव्हीवरील लोकप्रिय मालिकेतील कलाकारांनी लोकांच्या मनात आपलं खास स्थान निर्माण केलं आहे. सध्या या मालिकेत अनेक बोल्ड अभिनेत्रीचा समावेश झाला आहे. यापैकी एक आहे आराधना शर्मा (Aradhana Sharma). आपल्या बोल्ड आणि बेधडक वृत्तीमुळे आराधना नेहमीच चर्चेत असते. या मालिकेत आल्यानंतर तिची लोकप्रियता आणखी वाढली असून, तिच्याबद्दल लोकांच्या मनात उत्सुकता वाढली आहे. तिच्या एका मुलाखतीमधून तिनं आपल्या खासगी आयुष्यातील काही घटना सांगितल्या. बोल्ड आणि बेधडक असणारी आराधना एका घटनेमुळे खूपच घाबरली होती. त्याची आठवण तिनं चाहत्यांशी शेअर केली आहे.

झी न्यूज इंडिया डॉट कॉममध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, आराधना तिच्या प्रियकरासोबत डेटवर गेली होती. तिथं त्यानं तिला शारीरिक संबंधांसाठी बळजबरी करण्याचा प्रयत्न केला; पण आराधना त्यासाठी अजिबात तयार नव्हती. त्यामुळं तिनं त्याला स्पष्ट नकार दिला. अक्षरशः धक्काबुक्की करुन तिनं त्याला विरोध केला. ती यासाठी तयार नाही आणि ती हे करणार नाही, असं तिनं स्पष्ट केलं. जवळपास दीड वर्ष ती त्या व्यक्तीबरोबर रिलेशनशिपमध्ये होती. नंतर दोघांमध्ये शारीरिक संबंधही निर्माण झाले. या दरम्यान, एकदा तिची तब्येत बिघडली, त्यामुळं ती खूप घाबरली कारण तिला आपण प्रेग्नंट तर झालो नाही नां, याची भीती वाटत होती. तपासणीनंतर तिचा अहवाल निगेटीव्ह आला तेव्हा तिच्या जीवात जीव आला.


 स्प्लिट्सव्हिलाच्या १२ व्या(SpitsVilla-१२) पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झालेली आराधना शर्मा तिच्या बोल्ड स्टाईलमुळे चर्चेत होती. लोकांना तिचा बोल्ड अंदाज खूपच आवडला होता. या शोमधून पुढं आलेल्या आराधनानं आपल्या बोल्ड स्टाइलमुळे अल्पावधीतच छोट्या पडद्यावर आपलं स्थान निर्माण केलं. सोशल मीडियावर नेहमी आपले बोल्ड फोटो शेअर करणाऱ्या आराधना शर्माचे मोठ्या संख्येनं चाहते असून, ते तिच्या सौंदर्याची, अभिनयाची प्रशंसा करत असतात.

Post a Comment

0 Comments