बार्शी/प्रतिनिधी:
आमदार राजाभाऊ राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या बार्शी शहरात विविध ठिकाणी विकास कामे सुरू आहेत. बार्शीत क्रीडा क्षेत्राच्या विकासाला चालना मिळावी, उदयोन्मुख खेळाडूंसाठी सरावाची सोय व्हावी म्हणून भगवंत मैदानाचे नूतनीकरण व सुशोभीकरणाचे काम सध्या युद्ध पातळीवर पक्षनेते विजय नाना राऊत यांच्या देखरेखीखाली सुरू आहे. मैदानावर प्रकाशाची सोय करण्यात येणार असून, या ठिकाणी १६ मीटर उंचीचे ६ हायमास्ट दिव्यांचे पोल लावण्यात आले आहेत. प्रत्येक पोलवर ५०० वॅटचे प्रत्येकी १६ बल्ब बसविण्यात येणार आहेत.
यावेळी कामाची पाहणी करताना पक्षनेते विजय नाना राऊत, नगरसेवक भारत पवार सर, दिपक राऊत, विजय चव्हाण, ॲड. महेश जगताप, संदेश काकडे, संतोष भैय्या बारंगुळे, उपनगर अभियंता अविनाश शिंदे उपस्थित होते.
0 Comments