पंढरपूर/प्रतिनिधी;
पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथे ग्रामपंचायत शिपाई यांचा वाढदिवस साजरा करणे उपसरपंचाला महाग पडले आहे. वाखरी येथील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी चौथाऱ्यावर मोटर सायकल वर केक ठेऊन उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी मिळून ग्रामपंचायत शिपाई जितेंद्र कोरे यांचा वाढदिवस साजरा केला होता. याप्रकरणी पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात उपसरपंचासह बारा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
ग्रामीण पोलीस ठाण्यात बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गावचे उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्या विरोधात 295, 188,269 या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आली आहे. यामध्ये उपसरपंच संग्राम ज्ञानेश्वर गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य संजय विठ्ठल लेंगरे, योगेश पांढरे, शंकर महादेव सलगर, विठ्ठल परमेश्वर लोखंडे, सुधाकर मधुकर शिंदे, रोहित पांडुरंग गायकवाड, विश्वास लक्ष्मण कोळी, शिवाजी रंगनाथ हाके, किरण सुखदेव कांबळे, शिपाई जितेंद्र उर्फ नाना दिगंबर पोरे (रा. वाखरी ता. पंढरपूर) यांच्याविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. गावचे पोलीस पाटील बाळू गौतम शेंडे यांनी फिर्याद दिली आहे.
ग्रामपंचायत शिपाई यांचा वाढदिवस साजरा करणे पडले महाग..
सोलापूर जिल्ह्यामध्ये कोरोना पार्श्वभूमीवर सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी आहे. वाखरी येथील ज्ञानेश्वर महाराज पालखी चौथऱ्यावर उपसरपंचासह दहा ते बारा जण एकत्र येऊन ग्रामपंचायत शिपाई जितेंद्र कोरे यांचा वाढदिवस साजरा केला होता. त्यामुळे ग्रामपंचायतीतील उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी अशा प्रकारचे वाढदिवस साजरा केल्यामुळे गावांमध्ये वेगळा संदेश जात आहे. त्यातून कोरोना प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये वाखरी गाव कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले होते. अकरा जणांविरोधात पोलीस पाटील शेंडे यांनी फिर्याद देऊन गुन्हा दाखल केला आहे.
0 Comments