"सोशल मीडियावरील मैत्री नडली! गुंगीचे औषध देऊन महिला पोलीस अधिकाऱ्यावर लैगिंक अत्याचार"

मुंबई :

 फेसबूकवर झालेल्या मैत्रीतून महिला पोलीस अधिकाऱ्याबाबतीत धक्कादायक प्रकार उघड झाला. गुंगीचे औषध देऊन तिच्यावर लैगिंक अत्याचार करण्यात आला.

 तसेच तिचे अश्लील व्हिडीओ काढून धमकवल्याचेदेखील समोर आले आहे. या प्रकरणी पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपीचा शोध पोलीस घेत आहे.

 त्यावेळी शीतपेयातून महिलेला गुंगीचे औषध देऊन आरोपीने तीच्यावर बलात्कार केला. तसेच तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओही काढले. त्या व्हिडिओच्या सहाय्याने आरोपीने महिलेला धमकी देत तीच्यावर वारंवार बलात्कार केल्याचा आरोपही महिलेने केला आहे. दरम्यान, आरोपीने या व्हिडीओंचा वापर करून महिलेकडून अनेकदा पैशांची मागणीदेखील केली असल्याचे उघड झाले आहे. या त्रासाला कंटाळून अखेर या महिला अधिकाऱ्यांने पोलिसांत तक्रार केली. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहे.

Post a Comment

0 Comments