पंढरपूर/प्रतिनिधी: सरकोली गावचे सुपुत्र चि.सोमनाथ नंदकुमार माळी यांची ''भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संगठन'' येथे शास्त्रज्ञ म्हणून निवड, सोलापूर जिल्हा हा कोणत्याही बाबतीत मागे नाही संपूर्ण भारतात सोलापूर जिल्ह्याची ख्याती आहे. भारत देशात सोलापूर जिल्ह्यातील कष्टाळू,अभ्यासू मुले व मुली विविध क्षेत्रात अग्रेसर आहेत. विशेष बाब म्हणजे अश्या मुलांचे कुटुंब(पालक)हे कष्टकरी,मजूर आणि शेतकरी आहेत.
असाच प्रसंग आज सोलापूर जिल्ह्यातील सोमनाथ नंदकुमार माळी यांनी सोलापूर चे नाव लौकिक केले आहे. पंढरपुर तालुक्यातील मजुराचा मुलगा झाला शास्त्रज्ञ ! महाराष्ट्रातुन एकमेव निवड. अत्यंत खडतर परिस्थितीवर संघर्षाच्या जोरावर मात करत आकाशाला गवसणी घालणारे हे यश मिळविले आहे. मेहनत,जिद्द, चिकाटीनेच यशोशिखर गाठले असून हा प्रवास आजच्या पिढीसाठी एक आदर्श ठरेल.
0 Comments