बार्शी/प्रतिनिधी:
महाराष्ट्रातील सर्व लोककला केंद्र सुरू करण्याबाबत सरकारशी निवेदनाद्वारे पत्रव्यवहार करण्यासाठी महाराष्ट्रातील थिएटर मालकांची बैठक बार्शी तालुक्यातील जामगाव ( आ ) येथील राजलक्ष्मी कला केंद्र येथे पार पडली. या बैठकी मध्ये थिएटर सुरू करणे बाबत चर्चा करण्यात आली. या चर्चेमध्ये सर्वांनी आपली मते व्यक्त केली तसेच भविष्य काळात थिएटर मालक व कलावंतांच्या आडिअडचणी सोडवण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील असे ठरले.
महाराष्ट्रातील थिएटर ज्यावेळी चालू होतील त्यावेळी शासन ज्या अटी व शर्ती घालून देईल त्याचे पालन सर्वांनी करायचे असे सर्वानुमते ठरले. या बैठकीस सोलापूर , पूणे, लातूर , नगर ,नाशिक , कोल्हापूर, सातारा जिल्हा व मराठवाडा तसेच विदर्भ येथील ४०थिएटर मालक उपस्थीत होते.
0 Comments