पंढरपूर तालुक्यात पत्नीकडून पतीच्या अपहरणाची तक्रार, अवघ्या काही तासात पतीला घरी आणून सोडले


पंढरपूर/प्रतिनिधी:


पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथे मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास अपहरण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पत्नीने पंढरपूर तालुका पोलीस पतीच्या अपहरणाची तक्रार देण्यात आली. त्यानंतर काही तासांमध्येच अपहरण केलेल्या व्यक्तीला सुखरूप घरी आणून सोडले. याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी दिली आहे.

पतीच्या अपहरणाची तक्रार पत्नीकडून दाखल
पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथे शिव-पार्वती किराणा दुकान बंडू ज्ञानोबा शिंदे यांच्या मालकीचे आहे. मंगळवारी रात्री साडेआठच्या साडेआठच्या सुमारास दुकानासमोरून २ मोटारसायकलवरून आलेल्या ४ इसम व १ काळ्या रंगाच्या बोलेरो जीपमधुन २ इसम आले. या ६ अनोळखी इसमांनी पैशाचे कारणावरून अनिता यांचे पती बंडु ज्ञानोबा शिंदे यांना जबरदस्तीने पळवुन घेवुन गेले असल्याची तक्रार त्यांनी अनिता शिंदे यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यांमध दिली

पैशाच्या कारणावरून अपहरणाचा प्रकार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिता शिंदे यांनी पतीच्या अपहरणाची तक्रार पंढरपूर तालुका पोलीस ठाणे मध्ये तिन असता त्यानंतर काही तासानंतर अपहरणकर्त्यांनी पती बंडु शिंदे यांना सुखरूप घरी सोडले. पोलिसांकडून विचारणा केली असता पैशाच्या कारणावरून अपहरण केल्याचा प्रकार समोर येत आहे.  याबाबत पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात ३६५,३४ प्रमाणे गून्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments