कोरोणाच्या काळात गरोदर असणाऱ्या एका आईची आपल्या होणाऱ्या बाळाला वास्तवाचे भान करून देणारी एक केविलवाणी हाक


✒️गोपाळ कृष्णा गुरव मो. ९०४९०१९२०३


आई-वडील, भाऊ-बहीण ही नाती असतात
 रक्ताची, सुख दुःखात साथ देणारी.. 
हे माझ्या बाळाला सांगा 
कुणीतरी कारण कोरोणाच्या काळात 
जन्माला येणार आहे माझा बाळ गुणी...

वयोवृद्ध आईबापाची सेवा 
करून पुण्य मिळे लैई...
 हे माझ्या बाळाला सांगा कुणीतरी 
कारण कोरोणाच्या काळात जन्माला 
येणार आहे माझा बाळ गुणी..

रक्ताच्या नात्यापलीकडेही नाती 
असतात माणुसकीची, 
अनोळखी जीवाच्या जीवासाठी 
जीव धोक्यात घालणारी..
हे माझ्या बाळाला सांगा कुणीतरी 
कारण कोरोणाच्या काळात 
जन्माला येणार आहे माझा बाळ गुणी..

मेलेल्यांना संजीवनी आणून
 देणारे हनुमान होते फक्त पुराणात,
आजच्या युगात रुग्णांचा सौदा
 केला जातो या स्वार्थाच्या बाजारात...
हे माझ्या बाळाला सांगा कुणीतरी 
कारण कोरोणाच्या काळात 
जन्माला येणार आहे माझा बाळ गुणी..

विज्ञानाने केली खूप प्रगती, 
माणसाला बनवले लाखोंचा धनी.
परंतु स्वार्थाच्या या साथीत 
कुणीही देत नाही जीवाची हमी...

हे माझ्या बाळाला सांगा 
कुणीतरी कारण कोरोणाच्या 
काळात जन्माला येणार 
आहे माझा बाळ गुणी..

Post a Comment

6 Comments