हरियाणा:
अल्पवयीन अत्याचाराच्या घटना या सातत्याने घडत आहेत. अशीच एक भयंकर घटना हरियाणामध्ये घडली आहे. एका १० वर्षीय मुलीवर शाळेतील परिसरात ७ जणांकडून बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.
धक्कादायक म्हणजे यातील ६ मुले ही अल्पवयीन आहेत. आरोपींनी या घटनेचा व्हिडीओ बनवून तो काहींच्या व्हॉट्सॲपवर पाठवला होता. व्हायरल झालेला तो व्हिडीओ मुलीच्या वडिलांना देखील मिळाला. हे पाहून त्यांना खूप मोठा धक्काच बसला आणि त्यानंतर हा माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणामधील रेवाडीच्या रामपुरा पोलीस ठाणे परिसरात ही घटना घ़डली आहे. २४ मे रोजी मुलगी घराजवळच असलेल्या शाळेच्या मैदानात खेळत होती. त्या वेळी आजूबाजूला असलेल्या या मुलांनी तिला पकडून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. धक्कादायक म्हणजे हे कृत्य करणारी मुले ही ८ ते १४ वर्षे वयोगटातील असून यातील एकजण अठरा वर्षांचा आहे. तसेच त्यांनी या घटनेचा व्हिडीओ देखील शूट केला होता.
आरोपींनी शूट केलेला व्हिडीओ काही जणांना पाठवला होता. तिथूनच तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. व्हॉट्सॲपवर व्हायरल झालेला व्हि़डीओ पीडितेच्या वडिलांनाही दिसला आणि ते हादरलेच. त्यांनी याप्रकरणी तातडीने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी देखील आरोपींना ताब्यात घेतलं आहे. त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
0 Comments