प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने अभिनेता स्वप्नील जोशीसोबत किस करताना एक सीन दिला आहे. यानंतर आता मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने ट्रोल करणाऱ्यांना चांगलंच उत्तर दिलं आहे. मराठी अभिनेत्रींना किस करणं शोभत का?, या प्रश्नाला तेजस्विनीने रोखठोकपणे उत्तर दिलं आहे.
तो त्या कथानकाचा, व्यक्तिरेखेचा भाग असल्याचं म्हटलं आहे. तसेच अशी दृश्य देणं सोपं नसून लोकांना ट्रोल करणं सोपं असल्याचं देखील तेजस्विनीने म्हटलं आहे. या मुलाखतीत तेजस्विनीने उत्तर देत लोकंही अशाच लोकांना ट्रोल करतात जे चर्चेत असतात, असं म्हटलं आहे. तसेच याचं एक उद्दाहरण देताना समांतरच्या पहिल्या सीझनमध्ये सुरुवातीला त्याची चर्चा झाली मात्र नंतर समांतरचा पहिला सीझन इतका गाजला की ही गोष्ट मागे पडल्याचं तेजस्विनीने सांगितलं आहे.
समांतर ही सीरिज नामांकित मराठी लेखक सुहास शिरवळकर यांच्या समांतर या कादंबरीवर आधारित आहे. दोन भिन्न व्यक्ती व्यक्तीचं आयुष्य एकाच हस्तरेखेवर आधारित आहे. म्हणजे एकाचा भूतकाळ हा दुसऱ्याचा भविष्यकाळ असणार आहे. असं या सीरिजचं कथानक आहे. त्यामुळं भविष्य काळात होणाऱ्या वाईट घटना स्वप्नील जोशी रोखू शकेल का?, हे याचं उत्तर सांगणारी ही सीरिज आहे.
0 Comments