सोने-चांदीचा भाव वधारला, जाणून घ्या आजचा भाव



आज बुधवारी सोने आणि चांदीमध्ये वाढ  (gold silver rate) झाली.  सध्या सोन्याचा भाव ९० रुपयांनी वाढला असून चांदीमध्ये १६० रुपयांची वाढ झाली आहे. सलग तिसऱ्या दिवशी सोने महागले आहे.

सध्या सोन्याचा भाव ४७०७२ रुपये आहे. त्यात ६१ रुपयांची वाढ झाली. एक किलो चांदीचा भाव ६७६६० रुपये असून त्यात १४५ रुपयांची वाढ झाली आहे.

गेल्या शुक्रवारी सोन्याचा (gold silver rate) भाव ४६६६० रुपयांपर्यंत खाली आला होत. त्यानंतर तो ४६८०० रुपयांवर स्थिरावला. त्यात १५८ रुपयांची घसरण झाली होती. एक किलो चांदीचा भाव ६७५८० रुपयांपर्यंत खाली आला होता.

मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६११० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेटचा भाव ४७११० रुपये आहे. दिल्लीत आजचा २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६२६० रुपये झाला आहे.

२४ कॅरेटसाठी सोन्याचा भाव ५०३५० रुपये झाला आहे. आज चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४४५५० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४८६०० रुपये आहे. कोलकात्यात आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६२८० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ४८९८० रुपये आहे


Post a Comment

0 Comments