मुंबई :
राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. दरम्यान एकीकडे फडणवीसांच्या भेटीमुळे आश्चर्य व्यक्त होत असतानाच एकनाथ खडसेही शरद पवारांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत.काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्यावर दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या.
तेव्हापासून शरद पवार आपल्या निवासस्थानी आराम करत आहे. या काळात अनेक राजकीय पक्षांचे नेते शरद पवार यांना भेटून गेले आहेत. एकनाथ खडसे बुधवारी सकाळी सिल्व्हर ओकवर आले आणि त्यांनी पवारांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंतही याठिकाणी उपस्थित होते. ही केवळ सदिच्छा भेट असल्याचे एकनाथ खडसे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी मंगळवारी जळगाव दौऱ्यात खडसेंच्या घरी भेट दिली होती. त्यानंचर लगेचच खडसे पवारांच्या भेटीसाठी पोहोचल्याने नव्याने चर्चेला सुरुवात झाली आहे.एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर फडणवीस प्रथमच त्यांच्या घरी गेले होते. मात्र, यावेळी एकनाथ खडसे हे मुंबईत होते. देवेंद्र फडणवीस यांनी रक्षा खडसे यांच्या भेटीनंतर मुक्ताईनगरमधील ग्रामीण रुग्णलयाची पाहणी केली. तसेच वादळ आणि पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचीही पाहणी केली.
0 Comments