पंढरपूर/प्रतिनिधी:
पंढरपूर येथील मशानभुमी मध्ये मित्राच्या मटणाच्या पार्टीवरून वाद झाला. त्या वादाचे भांडणात रूपांतर झाले. मात्र या भांडणातून दोन मित्राने एका मित्रावर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी समाधान गायकवाड याच्यावर दोन मित्रांनी चाकूने हल्ला केला दोन्ही मित्रांना विरोधात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक अरुण पवार यांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंढरपूर शहरात समाधान गायकवाड, भारत, बाळा हे तिघे जण शहरातील मशानभुमी जवळ मटनच्या पार्टी निमित्ताने गेले होते. आता त्याच ठिकाणी समाधान गायकवाड याचे मित्र दादा कदम व किशोर बंदपट्टे हे तथे आले असता 'आम्हालाही जेवण घ्या' म्हणून समाधान गायकवाड याला मारहाण करू लागली. या दोघांनीही समाधान गायकवाड याच्या मानेवर चाकूने हल्ला केला यामध्ये समाधान गंभीररित्या जखमी झाला आहे.
समाधान गायकवाड गंभीररीत्या जखमी झाला होता त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले त्याच वेळी मित्र दादा कदम व किशोर बंद पट्टे यांनी आपल्यावर चाकू हल्ला केल्याचे त्यांनी सांगितले या दोघांनाही पंढरपूर शहर पोलिसांनी अटक केली आहे दोघांना न्यायालयासमोर हजर केले असता दोघांनाही पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
0 Comments