मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. अनेक सण समारंभ सध्या पध्दतीने साजरे करण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात येत आहे. तसेच, प्राचीन परंपरा लाभलेला आळंदी पंढरपूर पालखी सोहळ्यावर सुद्धा कोरोनाचे सावट आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले आहे.
फडणवीस पत्रात म्हणाले आहेत, मर्यादित वारकरी संख्येत कमीत कमी मुक्काम घेऊन तसेच, मुक्कामाच्या ठिकाणी गर्दी न करता , निर्बंधांचे पालन करत, गरज भासल्यास श्रींच्या पादुका बंदिस्त गाडीत ठेऊन पालखी सोहळा पार पाडण्यासाठी परवानगी द्यावी अशी विंनती केली आहे.
दरवर्षी वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पायी चालत पंढरीला जातात. गेल्यावर्षी कोरोनाच्या प्रकोपामुळे आषाढीवारी रद्द झाली होती. यंदा मुख्यमंत्री वारी संदर्भात काय निर्णय घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
0 Comments