शिवसेना शहरप्रमुखाची निर्घृण हत्या


अमरावती जिल्ह्यातील तिवसा पोलिस स्टेशन अंतर्गत येणारया राष्ट्रीय महामार्गावर एका वाईन बार परिसरात शिवसेनेचे तिवसा शहर प्रमुखाच्या डोळ्यात मिरचीपूड फेकून निर्घृण हत्या केल्याची घटना घडली.

तिवासा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या आशीर्वाद वाईन बारसमोर रात्री ५ जणांनी शिवसेनेचे तिवसा शहर प्रमुख अमोल पाटील यांची डोळ्यात मिरचीपूड टाकून ही हत्या केली. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

एका बारच्या बाहेर उभे असलेले शिवसेना शहर प्रमुख अमोल पाटील (वय ३४) यांच्या डोळ्यात हल्लेखोरांनी मिरची पूड फेकली आणि त्यानंतर त्यांच्यावर हल्ला केला. हा हल्ल्यात पाटील यांचा मृत्यू झाला.


या बाबत मिळालेल्या माहितीनुसार अमोल पाटील हे मित्रांसोबत बारमध्ये आले होते. मात्र बार बंद झाल्याने अमोल पाटील व त्याचा एक मित्र बारसमोर बसले होते. बारसमोर दारू पित असल्याची संधी साधून ५ आरोपींनी अमोल पाटील यांच्या हल्ला चढवला. डोक्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करत त्यांना जागीच ठार केले.

Post a Comment

0 Comments