“आरक्षणासाठी ओबीसी समाजाचे मंत्री एकत्र येतात अन् मराठा मंत्री केवळ बघ्याची भूमिका घेतात”


आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यातील ओबीसी मंत्री एकत्र झाले असल्याचं दिसून येत आहे. मात्र मराठा मंत्री केवळ बघ्याची भूमिका घेतात अशी प्रतिक्रिया  माजी आमदार तथा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडाळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील दिली आहे. खरं तर हेच मराठा समाजाचं मोठं दुर्दैव आहे, असं म्हणत त्यांनी खंत व्यक्त केली आहे. यासंदर्भात नरेंद्र पाटील यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्वीट केलं आहे.

समाजाला डावलून राजकारणाला उराशी धरणाऱ्या विकृतीला मराठा बांधव नक्कीच उत्तर देतील, अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. तसेच ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर सर्व पक्षीय नेत्यांनी एकजूट दाखवत आरक्षण मिळवण्याबद्दलचा निर्धार व्यक्त केला. ओबीसी आरक्षणासाठी समाजातील सर्व मंत्री आणि नेते एकत्र आल्याचं बघायला मिळालं.

 


Post a Comment

0 Comments