बार्शी/प्रतिनिधी :
बार्शी शहर पोलीस ठाणे हद्दीत मोठ्याप्रमाणात अवैधधंदे सुरू आहेत त्याबद्दल अनेक सर्वसामान्य नागरिक तक्रारी देतात. स्थानिक पोलीस त्याकडे दुर्लक्ष करतात, परंतु पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली व आदेशाने अंमली पदार्थ विरोधी विशेष पथकाने थेट बार्शीत येऊन गांजा पकडुन एका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ज्यामुळे बार्शी शहरात अवैधधंदे सुरू आहेत हे पुन्हा सिद्ध झाले आहे.
आज दिनांक २१/०६/२०२१ रोजी बार्शी शहर पोलीस ठाणे हददीत विशेष पथक फिरत असताना बातमीदारा मार्फत माहिती मिळाली त्याप्रमाणे, छाप्यासाठी लागणारे आवश्यक साहित्य लॅपटॉप, प्रिंटर, वजनकाटा, लाखी सिल व कागद याचेसह सरकारी वाहनाने पंचसह तेथे गेले त्यावेळी सदर पथकास बार्शी ते ताडसौंदणेकडे जाणाऱ्या रस्त्यालगत वीट भट्टीजवळ मिरगणे हा गांजा विकताना सापडला सदरची कारवाई पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत धाराशिवकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक माहुरकर, पोहवा शहाजी जाधव, ननवरे, जाधव, पोकॉ निलेश केरुर, चालक शेरदी यांचे विशेष पथकाने पार पडली.
कुमार एकनाथ मिरगणे, वय ६२ वर्षे रा. सुभाष नगर, बार्शी, जिल्हा सोलापूर हा त्याच्या ताब्यात कोणत्याही प्रकारचा कायदेशीर परवाना नसताना त्याचे ताब्यातील ६९५ ग्रॅम वजनाचा अंदाजे ५०००/- रुपये किंमतीचा गांजा जवळ बाळगून विक्री करताना मिळून आला आहे, म्हणून त्याच्याविरुध्द एनडीपीएस कायदा १९८५ कलम ८(क), २० (ब) २ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा अवैध धंद्यांना अभय देणाऱ्या स्थानिक पोलिस अधिकाऱ्याचा देखील शोध घेऊन त्यांचे विरुद्ध पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते या कारवाई करतील का? याकडे देखील सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
0 Comments