"मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही, १६ जूनपासून आंदोलनाला सुरुवात" ; संभाजीराजेंचा इशारा


रायगड:

आज देशात राज्यात सर्व समाज घटकांना आरक्षण देण्यात आले आहे मात्र मराठा समाजाला न्याय मिळत नसल्याची खंत व्यक्त करत खा छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही, १६ जूनपासून आंदोलनाला सुरुवात करणार असल्याचे इशारा किल्ले रायगड वरून दिला.

शिवराज्याभिषेकाचं वैशिष्ट्य म्हणजे यंदा शिवकालीन सुवर्ण होन च्या साक्षीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक होणार आहे. या सुवर्ण होन ३५० वर्षांपूर्वीच्या आहेत. ज्या स्वराज्यातील एका शिलेदारांच्या कुटुंबाने जपून ठेवल्या होत्या. या सुवर्ण होन आतापर्यंतचा सापडलेला सर्वात महत्त्वाचा अमुल्य असा ऐतिहासिक ठेवा असल्याचं छत्रपती संभाजीराजे सांगून गडावरील एक एक वस्तु चे जतन करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले 
    
 हिंदवी स्वराज्याची संस्थापक आणि अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३४८ वा राज्याभिषेक सोहळा (आज) रविवारी किल्ले रायगडावर साजरा करण्यात आला यावेळी ते बोलत होते 

    या वेळी बोलताना तुम्ही समाजाचा खेळ केला तर आम्ही गप्प बसणार नाही. मी संयमी आहे, आजपर्यंत सहन केलं पण आता मी गप्प बसणार नाही, काय होईल ते होईल असं सांगत संभाजीराजे छत्रपतींनी मराठा समाजाला आंदोलनाची हाक दिली आहे. येत्या १६ जून पासून राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीपासून मराठा समाजाच्या आंदोलनाला सुरुवात होईल असं संभाजीराजे म्हणाले. 
       
 किल्ले रायगडावर साजरा होणाऱ्या ३४८ व्या शिवराज्याभिषेकाचं वैशिष्ट्य म्हणजे यंदा शिवकालीन सुवर्ण होन च्या साक्षीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक होणार आहे. या सुवर्ण होन ३५० वर्षांपूर्वीच्या आहेत. ज्या स्वराज्यातील एका शिलेदारांच्या कुटुंबाने जपून ठेवल्या होत्या. या सुवर्ण होन आतापर्यंतचा सापडलेला सर्वात महत्त्वाचा अमुल्य असा ऐतिहासिक ठेवा असल्याचं छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.
     
  दरम्यान, कोरोनाच्या महामारीमुळे शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी मागील वर्षी इथं विशेष परवानगी घेण्यात आली होती. यंदा देखील हा सोहळा अवघ्या काही मोजक्या शिवभक्तांच्या उपस्थितच साजरा करण्यात आला असून शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त परंपरेनुसार होणारे सर्व कार्यक्रम करण्यात आले  तर, शिवप्रेमींच्या भावनांचा आदर करीत कोरोनाच्या महामारीमुळे शिवप्रेमींना घरूनच शिवराज्याभिषेक साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले होते.त्यालाच अनुसरून अनेक शिवभक्तांनी घरी रहात शिवराज्याभिषेक साजरा केला 
       
 कोविड १९ संसर्गामुळे सलग दुसऱ्यावर्षी किल्ले रायगडावर मर्यादित शिवभक्तांच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात  आला  आहे. पहाटेच्या सुमारास राज सदरेवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मेघडंबरीतील मूर्तीस फुलांनी सजवण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ६ वाजता स्वराज्याचे निशाण भगवा ध्वजपूजन करण्यात आले. त्यानंतर रेकाँर्डेड शाहिरी कार्यक्रमांचं सादरीकरण करण्यात आला . या नंतर  मुख्य सोहळा किल्ले रायगडावरील राज सदरेत  सुरू करण्यात आला . सकाळी ८.३० वाजता युवराज संभाजीराजे छत्रपती आणि युवराज शहाजीराजे यांचे राज सदरेत आगमन झाले या वेळी उपस्थित मोजक्या मावळ्यांनी शिवाजीराजे याचा जयजयकार करत संपूर्ण परिसर भगवेमय करून टाकला.

शिवराज्याभिषेक सोहळ्यास सुरवात पूर्वी  मेघडंबरीमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून मानचा मुजरा करण्यात आला, या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिकात्मक मूर्तीस राज्याभिषेक करण्यात आला शेवटी  छत्रपती शिवाजी महाराजांच्या उत्सवमूर्तीची पालखीतून मिरवणूक राज सदरेतून, नगारखाना, होळीचा माळ, मुख्य सचिवालय (बाजारपेठ) या मार्गाने जगदिश्वर मंदिराकडे निघाली . जगदिश्वर मंदिरात दर्शन झाल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी पुष्पहार आर्पण करुन या शिवराज्यभिषेक सोहळ्याची सांगता करण्यात आली.

Post a Comment

0 Comments