नाशिक : छगन भुजबळ यांनी विरोधी पक्षनेेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली असल्याचा खुलासा केला होता. त्यात त्यांनी ओबीसी आरक्षणावर मदत मागितल्याचं देखील सांगितलं आहे. त्यानंतर शिवसेना त्यांच्यावर नाराज असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यांनंंतर आता शिवसेना खासदार संजय राऊतांच्या एका वक्तव्यानं राजकारणात खळबळ उडाली आहे.
नाशिकात पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यशैलीमुळे शिवसेनेच्या अनेक आमदारांना निधी मिळवण्यासाठी अडचणी येत आहेत, शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी संजय राऊत यांच्याकडे याबद्दल तक्रारी केल्या होत्या.
विधानसभा निवडणुकीत अधिकाधिक आमदार निवडून आणले तर आपलाच पालकमंत्री बसवता येईल, अशी व्यवस्था करा यासाठी कामाला लागण्याचे आदेश राऊत यांनी दिले आहेत. राज्यात पाच वर्षे शिवसेनेचाच मुख्यमंत्री राहणार आहे. महाविकास आघाडीची स्थापना करतानाच हे ठरलं असल्याचं राऊत यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केेलं होतं.
दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी शिवसेनेचं तोंडभरून कौतुक केलं होतं. त्यात त्यांनी शिवसेना विश्वासू पक्ष असल्याचं सांगितलं होतं.
0 Comments