उस्मानाबादेत विवाहपूर्वीच तुझा कौमार्यभंग झाल्याचा आरोप करत नवविवाहितेचा छळ, पतीसह ८ जणांविरोधात गुन्हा दाखल



उस्मानाबाद/प्रतिनिधी:

एका २३ वर्षीय विवाहित तरुणीचा एका अजब कारणामुळे सासरच्यांनी छळ  केला आहे. एक महिन्यापूर्वी लग्न झाले होते. विवाहपूर्वीच तुझा कौमार्यभंग झाल्याचा  आरोप करत नवऱ्यानं आणि सासरच्या कुटुंबीयांनी तरुणीला अमानुष वागणूक दिली आहे. याप्रकरणी पीडितनं पोलिसांत तक्रार दाखल केली असून आरोपी पतीसोबतच सासरच्या आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यातील रहिवासी आहे. लग्नाच्या एका महिन्यातच सासरच्यांनी तिचा छळ सुरू केला आहे. विवाहापूर्वीचं तुझा कौमार्य भंग झाला असल्याचा संशय पतीनं व्यक्त केला. त्यामुळे सासरच्या मंडळीनं नवविवाहित तरुणीनं माहेरहून पैसे आणावेत, यासाठी छळ सुरू केला. सासू सासऱ्यसहित सासरकडील आठ लोकांनी तिचा सतत शारीरिक आणि मानसिक छळ केला आहे.

सासरच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडितेनं पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पीडित विवाहितेनं दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी सासरच्या ८ जणांविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केली नसून आरोपींची चौकशी केली जात आहे. 

Post a Comment

0 Comments