....अन् अंत्यसंस्कार झालेली वृद्ध महिला दहा दिवसांनी घरी परतली


आंध्रप्रदेश!

कोरोना संकटात अशा काही आश्चर्यकारक घटना घडत आहेत, वृद्ध महिला मेली म्हणून अंत्यसंस्कार झाले आणि तीच व्यक्ती पुन्हा जिवंत होऊन समोर आली तर! अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना आंध्र प्रदेशच्या कृष्णा जिल्ह्यात घडली आहे. ७० वर्षीय एका वृद्ध महिलेवर अत्यंसस्कार करण्यात आले. मात्र, त्याच्या काही दिवसानंतर जयाम्मा घरी परतल्या तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

जयम्मा नावाच्या महिलेला कोरोनाची लागण झाली होती. त्यांना उपचारासाठी १२ तारखेला विजयवाडा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, अचानक त्या १५ तारखेला रुग्णालयातून बेपत्ता झाल्या. त्यानंतर कुटुंबीयांकडून त्यांचा शोध घेण्यात आला. 

अखेर कुटुंबाला एक मृतदेह सापडला. त्यांनी जयम्मा समजून त्या मृतदेहावर अत्यसंस्कार केले. जयाम्मा यांच्या मृत्यूनंतर १० दिवसात त्यांच्या मुलाचाही कोरोनाने मृत्यू झाला. या सर्व घटनेमुळे त्याच्या कुटुंबीयांवर मोठी शोककळा पसरली होती. यातच जयाम्मा अचानक आज ऑटोतून घरी आल्या. जयाम्मांना जिवंत पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

Post a Comment

0 Comments