सोन्याच्या भावात घसरण, जाणून घ्या आजचा दर
गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे सोन्याच्या (gold price today) किंमतीत एका विशिष्ट मर्यादेत चढउतार पाहायला मिळत आहेत.
सोन्याचे भाव हे ४७ हजारांच्या उंबरठ्यावर अडकून पडले आहेत. मंगळवारी बाजारपेठ उघडल्यानंतर २२ कॅरेटच्या प्रतितोळा सोन्याची किंमत ४६१६० रुपये इतकी नोंदवण्यात आली. तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४७,१६० रुपये इतका आहे.
सोमवारी सोन्याचा भाव ११६ रुपयांनी व चांदीचा भाव १६१ रुपयांनी वधारला होता. बाजार बंद होताना सोन्याचा प्रतितोळा दर ४६,३३७ रुपये इतका नोंदवण्यात आला होता. या तुलनेत आज सोन्याच्या भावात साधारण १७० रुपयांची घसरण पाहायला मिळत आहे.
गेल्या काही काळापासून चढे असलेले सोन्याचे दर आता काहीसे स्थिरावताना दिसत आहेत. गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात (Gold Rate) अनेक चढउतार पाहायला मिळाले. सोन्याचा प्रतितोळा दर ४६९५६ रुपये इतका झाला होता.
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर १४ एप्रिलनंतर पहिल्यांदाच सोन्याच्या दरात इतकी घसरण झालेली आहे. १४ एप्रिल रोजी MCX वर सोन्याचा बाजार बंद होतानाचा भाव प्रतितोळा ४६८३१ रुपये इतका होता. तर १५ एप्रिलला हाच दर प्रतितोळा ४७४०१ रुपये इतका होता. या हिशेबाने सोन्याचे दर सध्या अडीच महिन्यांतील निचांकी पातळीवर पोहोचले आहेत.
0 Comments