"मुली पळून जाऊ द्यायच्या नसतील तर त्यांना फोनपासून दूर ठेवा"


उत्तर प्रदेशात बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होत असून नुकतीच अलीगढ येथे आणखी एक बलात्काराची घटना घडली. यावर बोलताना राज्य महिला आयोगाच्या सदस्य मीना कुमारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. मुलींकडे मोबाईल असल्यास त्या कुणाला बोलतात, काय करतात याकडे लक्ष द्यायला हवं, असं मीना कुमारी यांनी म्हटलंय. तसेच मुलींना मोबाईल देऊ नका, असं आवाहन मीना कुमारी यांनी यावेळी केलं आहे.

कालच माझ्याकडे एक मॅटर आला होता, वाल्मिकीची मुलगी आणि जाट समाजाचा मुलगा, ते माझ्याकडे आले होते. लोकांनी त्यांच्यावर दबाव टाकल्यानंतर दोघांनी लग्न केले. त्यावेळी, गावातील लोकांनी पंचायत बोलावून, आम्ही त्यांना घरात घुसू देणार नसल्याचं म्हटलं, असं मीना कुमारी यांनी सांगितलं.

दरम्यान, बलात्कारांच्या वाढत्या घटनांबद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर प्रदेश महिला आयोगाच्या सदस्य असलेल्या मीना कुमारी यांनी अजबच उत्तर दिलंय. मीना कुमारी यांच्या या उत्तरावरुन त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments