नवी दिल्ली :
तुम्ही शेतकरी असाल आणि महिन्याला ३००० रुपये फायदा मिळवू इच्छित असाल तर ही आनंदाची बातमी तुमच्यासाठीच आहे. केंद्र सरकारच्या ‘पीएम शेतकरी सन्मान निधी’ या योजनेंतर्गत तुम्ही शेतकरी म्हणून लाभार्थी असाल तर तुम्हाला दरमहा ३ हजार रुपये मिळतील.
अगोदरपासून तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल, तर तुम्ही आणखी एका योजनेचा लाभ घेऊ शकता. ही आहे पीएम शेतकरी मानधन योजना, यामध्ये वार्षिक ३६ हजार रुपयांचा लाभ तुम्हाला घेता येईल. म्हणजे एकूण फायदा दरवर्षी ४२ हजार रुपयांचा होईल.
पीएम शेतकरी मानधन योजनेसाठी तुम्हाला वेगळी कागदपत्रे द्यावी लागत नाहीत. पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेमध्ये पीएम शेतकरी मानधन योजना पण मिळू शकते. ज्यानुसार शेतकरी लाभार्थ्यांना वर्षाला ३५ हजार रुपये देण्यात येतात.
असे मिळवा वार्षिक ४२ हजार रुपये:
‘पीएम शेतकरी मानधन योजने’नुसार शेतकऱ्यांच्या खात्यांत महिन्याला ३ हजार रुपये पाठवण्यात येतात. याशिवाय पीएम शेतकरी सन्मान निधी या योजनेंतर्गत वर्षाला ६ हजार रुपयांचा अतिरिक्त लाभ मिळतो. म्हणजे दोन्ही योजनांचे मिळून तुम्हाला वर्षाला ४२ हजार रुपये मिळतील.
लाभ कोणाला?:
‘मानधन योजने’चा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याचे वय १८ ते ४० असणे महत्त्वाचे आहे. दुसरी अट अशी आहे की शेतकऱ्याकडे किमान २ हेक्टर जमीन असायला हवी. याअंतर्गत शेतकऱ्याला महिन्याला किमान ५५ रुपये व कमाल २०० रुपयांचा प्रीमियम भाराव लागेल.
या सुविधेला तुम्ही कोणत्या वयाचे असताना जोडले जात आहात, त्या वयाच्या टप्प्यांनुसार तुम्हाला हा प्रीमियम द्यावा लागेल. वयाच्या १८व्या वर्षी महिन्याला ५५ रुपये, वयाच्या ३०व्या वर्षी महिन्याला ११० रुपये, वयाच्या चाळीसाव्या वर्षी महिन्याला २०० रुपये अशी प्रीमियमची रक्कम असेल. असं समजा की ही योजना शेतकऱ्यांसाठी एकप्रकारे पेन्शन योजनाच आहे.
0 Comments