बार्शी/प्रतिनिधी:
सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्द ठरवण्याचा निर्णय सुनावला आहे. सरकारच्या निष्काळजी व नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द होऊन संपुष्टात आले आहे, असा आरोप समता परिषद केला आहे. विविध संघटनेच्या वतीने आज सकाळी ११.३० वाजता बार्शी मध्ये पोस्ट चौक बार्शी मध्ये रस्ता रोको आंदोलन करण्यात आला.
स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण रद्द झाल्यामुळे ग्रामपंचायत सदस्य ते महापौरापर्यंतच्या पदावर ओबीसीचा माणूस कधीच बसू शकणार नाही. ओबीसीच्या हक्काच्या आरक्षणावर हल्ला झाला आहे. कोणत्या सरकारची चूक आहे हे पाहण्यापेक्षा व्यापक आंदोलन उभा करण्याची गरज आहे. त्यामुळे सर्वांनी राजकीय जोडे बाजूला ठेवून सर्वांनी आपल्या येणाऱ्या पुढील पिढीसाठी किंवा स्वत:च्या समाजाच्या प्रगतीसाठी आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी केले.
ओबीसी समाजाला आत्मविश्वास नडला असून झोपलेल्या ओबीसीने जागे होऊन सरकार विरोधात आंदोलनात सहभागी व्हावे. ओबीसींच्या प्रत्येक वाड्या, वस्त्या, गावपातळीवर जाऊन आपल्या हक्काचे आरक्षण सर्वाच्च न्यायालयाने हिसकावून घेतले असल्याची जनजागृती करणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण सर्वाेच्च न्यायालयाने रद्द केले असून ते पूर्ववत करण्यात यावे, पदोन्नतीमधील आरक्षण रद्द केले असून ते पूर्ववत करण्यात यावे. ओबीसींची जनगणना करण्यात यावी, या मागणीसाठी आंदोलन उभे करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
0 Comments