कोरोनाच्या संकटात फार्मासिस्टची भूमिका!



✒️आशिष अरुण कर्ले, (फार्मासिस्ट, लेखक)

फार्मासिस्ट म्हटलं की लोकांना आठवतो वाटतो तो केवळ एक औषधविक्रेता! पण खरंच फार्मासिस्ट म्हणजे केवळ औषध विक्रेता आहे का?अस असते तर मग नोंदणीकृत फार्मासिस्ट बनण्यासाठी फार्मसी संदर्भात शैक्षणिक पात्रता असण्याची आवश्यकताच नव्हती कोणीही औषधे विकली असतील ना!

आजच्या या कोरोनाच्या संकटात फार्मासिस्ट सुद्धा मागे नाही! या सर्व परिस्थिती फार्मासिस्ट सुद्धा कोरोना योध्दा म्हणून नेटाने लढत आहे जरी तो प्रकाशझोतात येत नसला तरी आपले आपले कर्तव्य नेटाने पार पाडत आहे!
फार्मासिस्ट केवळ औषध वितरण करणारी व्यक्ती नसून ती अशी व्यक्ती आहे जिला औषधांसंबंधित सविस्तर माहिती असते.या परिस्थितीत लोकांना सेल्फ मेडिकेशन पासून दूर ठेवून त्यांना योग्य सल्ला हा केवळ फार्मासिस्टच देऊ शकतो. आजच्या घडीला जिथे खाजगी डॉक्टरांना सांगावं लागत आहे की क्लिनिक सुरू ठेवा अन्यथा परवाने रद्द होतील तिथे दुसऱ्या बाजूला फार्मासिस्ट न सांगता अत्यावश्यक सेवा म्हणून रुग्णांच्या सेवेत हजर आहे
जर खोलवर जाऊन विचार केला तर कोरोनाच्या युद्धात फार्मासिस्टची भूमिका खूप महत्वाची आहे! फार्मासिस्ट लोकांना एक मानसिक आधार देऊ शकतो शिवाय लोकांना रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी योग्य आहार याबद्दल देखील मार्गदर्शन करू शकतो! इतकेच नव्हे तर मेडिकल (फार्मसी) मध्ये येणाऱ्या लोकांच्या नोंदी ठेवून ही माहिती प्रशासकीय यंत्रणांना कमी येऊ शकते.यामध्ये तो रुग्णांचे वय,रुग्ण इतिहास ज्यात जर त्यांना रक्तदाब,मधुमेह असे काही आजार असतील त्यांना कोरोना सदृश्य काही लक्षणे आढळत असतील तर ही माहिती तो ठेवू शकतो!
केवळ तो औषध वितरण नव्हे तर औषध संशोधन औषध निर्मिती या क्षेत्रात फार्मासिस्ट महत्वाचा आहे औषध वितरण तर त्याच्या कामाचा एक भाग आहे जो सर्वांच्या नजरेत येतो पण या पलीकडे देखील त्याच्या अनेक महत्वपूर्ण भूमिका आहेत.शिवाय औषध वितरण म्हणजे केवळ डॉक्टरांनी लिहून दिलेलं औषध देणे एवढेच नाही तर ती देखील एक वैद्यकीय प्रक्रिया आहे.ज्यामध्ये लोकांमध्ये सुरक्षित औषध वापर होऊ शकतो,दोन एकत्रित औषधांचा अनिष्ट परिणाम टाळता येतो ,प्रतिजैविके मधील औषध विरोध ही समस्या टाळता येते.

शिवाय हॉस्पिटलमध्ये सध्या कोव्हिड १९ बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत यात डॉक्टरांसोबत क्लिनिकल फार्मासिस्टची भूमिका वाढवली तर उपचारादरम्यान औषधांच्या अनिष्ट परिणामामुळे रुग्ण दगवत आहेत हे प्रमाण टाळता येईल.शिवाय कमीत कमी औषध मात्र (डोस) वापरून कमीत कमी साईड इफेक्ट्स सह चांगले उपचार देण्यासाठी फार्मासिस्टची भूमिका मोलाची ठरू शकते.

त्याचबरोबरीने औषध संशोधन हे क्षेत्र आहे जिथे औषधनिर्मिती कंपन्यांमध्ये औषध संशोधन (R&D) विभाग इथे देखील फार्मासिस्टची भूमिका महत्त्वाची आहे.
या सद्यस्थितीत सर्व ऑनलाइन औषध सेवा नाही तर आपला जवळचा फार्मासिस्टच अत्यावश्यक सेवा म्हणून औषध सेवा देत आहेत! हा केवळ व्यवसाय म्हणून नव्हे तर एक सामाजिक बांधिलकी आहे यात!

फार्मासिस्ट म्हटलं की लोकांच्या डोळ्यासमोर येते ते मेडिकल आणि तिथे औषध विक्री करणारा एक व्यवसायिक पण खरंच फार्मासिस्ट म्हणजे काय केवळ औषध विक्री करणारा एक व्यावसायिक नसून तो देखील आरोग्य यंत्रनेचा एक भाग आहे आणि कोरोना परिस्थितीत त्याची भूमिका महत्त्वाची आहे!

ज्यावेळी आपण एखादा चित्रपट किंवा नाटक बघतो तेव्हा आपल्या लक्षात केवळ नायक नायिकाच राहतात! केवळ नायक-नायिकाच प्रकाश झोतात येतात त्यांना केवळ प्रसिद्धी मानसन्मान भेटतो पण दुसऱ्या बाजूला हा चित्रपट किंवा नाटक आपल्यासमोर येण्यासाठी पडद्यामागे राहून कित्येक कलाकार व तंत्रज्ञ व सहकलाकार काम करत असतात मेहनत घेत असतात खरे पाहता त्यांच्यात मेहनतीतून व कष्टातून इतकी सुंदर कलाकृती आपल्यापर्यंत पोहोचत असते पण दुर्दैव आणि ते मात्र कधीच प्रकाशझोतात येत नाहीत ना त्यांना कधी प्रसिद्धी व मानसन्मान मिळत नाही.अशीच काहीशी अवस्था आरोग्य यंत्रणेतील अविभाज्य घटक असलेल्या फार्मासिस्टची ची झालेली आहे!

कला क्षेत्रात पडद्यामागे राहून काम करणाऱ्या कलाकार,तंत्रज्ञ व सहकलाकारांप्रमाणेच तो देखील अनेक महत्वाच्या भूमिका बजावत असतो पण त्याचे ते कार्य व मेहनत मात्र कधीच लोकांपर्यंत पोहचत नाही!
औषध वितरण हे फार्मासिस्टच्या सेवेच एक अंग झालं त्यापलीकडे देखील तो अनेक महत्वाच्या जाबाबऱ्या व भूमिका निभावत असतो जे की लोकांना कधी माहीतच नसत!

सध्या या कोरोना विरुद्ध लढणारे डॉक्टर, नर्स यांचे समाज मध्यम,मीडिया याद्वारे आभार मानत आहेत त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करत आहेत पण फार्मासिस्टचा मात्र कोणी साधा उल्लेख सुद्धा करत नाही! आदरणीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेलं ट्विट वगळता कोणीही फार्मासिस्टबद्दल कृतज्ञता व्यक्त करत नाही त्यांचे आभार मानत नाहीत.

फार्मासिस्ट सुद्धा आवल्या परीने नेटाने या कोरोना विरुद्ध लढा देत आहे पण तरीही त्याच्या पदरी मात्र केवळ उपेक्षाच आहे तथापि त्याने आपल्या या आरोग्य सेवेच हे अविरत व्रत कुठेही थांबवलेल नाही आणि कधीच थांबवणारही नाही!

डॉक्टर जे औषध लिहीतात आणि ते फार्मासिस्ट देतो केवळ इथपर्यंतच लोकांना माहिती आहे पण या दरम्यान या औषधाचे संशोधन इथपासून ते त्याचे प्रिक्लिनिकल स्टडी प्राण्यामध्ये त्या औषधाच्या सुरक्षिततेचा अभ्यास,त्यानंतर क्लिनिकल ट्रायल अर्थात ठराविक लोकांचा व रुग्णाचा समूह यावर वेगवेगळ्या फेज मध्ये औषधांचा अभ्यास आणि हे सगळं झाल्यावर हे औषधाची निर्मिती,मार्केटिंग व मार्केट मध्ये आल्यानंतर देखील त्याच्या सुरक्षिततेची पडताळणी करण्यासाठी फर्माकोव्हीजलन्स ज्यामध्ये औषधाचे दुष्परिणाम याबद्दल येणाऱ्या सांख्यिकी महितीवर काम करणं या सर्व क्षेत्रात फार्मसिस्ट आपली भूमिका पार पाडत असतो!औषध वितरण हे तर फार्मासिस्टच्या कामाचे एक अंग झाले पण त्यापलीकडे देखील या सर्व कामात फार्मासिस्ट जबाबदाऱ्या पार पाडत असतो
पण दुर्दैवाने ज्याप्रमाणे कलाक्षेत्रात पडद्यामागे राहून काम करणाऱ्या कलाकारांचं काम जसे सर्वांसमोर येत नाही तसेच फार्मासिस्टच्या या भूमिका प्रकाशझोतात येत नाहीत! सध्या कोरोना वरील औषध संशोधन यातही फार्मासिस्टची भूमिका महत्त्वाची ठरू शकते.

आज सर्वजण डॉक्टर आणि नर्स चे आभार मानत आहेत पण फारसा दिसला मात्र सर्वजण विसरले आहेत तरीदेखील आपला फार्मासिस्ट आपल्या कर्तव्यात कुठेही मागे नाही! फार्मा क्षेत्रातील रिसर्च आणि डेव्हलपमेंट विभात आजही कोरोनासाठी औषध व लस यावर संशोधन सुरू आहे जलद तपासणी चाचण्या करण्यासाठी किट बनवण्यासाठी काम सुरू आहे औषध पुरवठा सुरळीत राहावा म्हणून फार्मास्युटिकल इंडस्ट्री मध्ये फार्मासिस्ट काम करत आहेत.औषध सेवा सुरू राहावी अत्यावश्यक सेवेचा भाग म्हणून म्हणून कम्युनिटी फार्मासिस्ट काम करत आहे हॉस्पिटलमध्ये डॉक्टर नर्स यांच्या प्रमाणेच हॉस्पिटल फार्मासिस्ट व क्लिनिकल फार्मासिस्ट देखील आपली जबाबदारी निभावत आहे.

पडद्यामागे असला तरी फार्मासिस्ट देखील आपल्या परीने नेटाने कोरोनविरुद्ध लढत आहे आणि पुढेही आरोग्य यंत्रणेचा अविभाज्य घटक व समाजाप्रती बांधिलकी या नात्याने अशीच अविरत सेवा देत राहणार!
फार्मासिस्ट तुमच्या आरोग्यासाठी!



Post a Comment

0 Comments