मानवी विष्ठा उचलावयास लावून अमानवीय कृत्य ! टेंभुर्णीचे पीआय राजकुमार केंद्रेंचा पदभार घेतला काढून


टेंभुर्णी/प्रतिनिधी:

पोलीस ठाण्यात बोलावून जबरदस्तीने आवारातील मानवी विष्ठा उचलावयास लावून अमानवीय कृत्य केल्याच्या घटनेची पोलीस अधीक्षकांनी गांभीर्याने दखल घेतली.पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांचा पदभार काढून घेतला आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांची सोलापूर येथे नियंत्रण कक्षात नियुक्ती केली आहे. त्यांचा पदभार करमाळा विभागाचे पोलिस अधिकारी विषाल अहिरे यांच्याकडे देण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांच्या आदेशानुसार २९ मे रोजी दुपारी १२ च्या सुमारास १५ ते २० पोलीस कर्मचारी पाठवून पोलीस स्टेशनच्या कंपाउंड शेजारी राहणाऱ्या कुटुंबातील महिला – तरुण मुली व पुरुष यांना बोलावून आवारातील साफसफाई करायला लावली होती.

पीआय राजकुमार केंद्रे यांनी आपल्या पदाचा व अधिकाराचा गैरवापर करत पोलिसी बळाच्या जोरावर ठाण्यात शेजारील मांग वस्तीतील महिलांवर अन्याय अत्याचार करून मानवी व जनावरांची विस्टा घाण कचरा गोळा करायला लावून अमानुष व कायदेशीर कृत्य केले.








 

Post a Comment

0 Comments