पंढरपूर विधानसभा! प्रमुख मंत्र्यांच्या सभा होऊनही झालेला पराभव राष्ट्रवादीला जिव्हारी लावणारा ; वर्धानपदिनानिमित्त जखमेवरची खपली पुन्हा निघाली


पंढरपूर:

राष्ट्रवादीच्या वर्धानपदिनानिमित्त घेण्यात आलेल्या आढाव्यात पोटनिवडणुकीतील पराभवाची जखम अधिकच ठसठसणारी ठरली आहे. महाविकास आघाडीने एकत्र लढून हि बालेकिल्लात झालेले झालेला पराभव हि निश्चितच क्लेशदायक ठरला.
     
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात २००९ आणि २०१४ मध्ये सलग दोन पराभव झाल्यानंतर बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व संपण्याच्या मार्गावर होते. मात्र, आमदार भारत भालके यांच्या २०१९ मधील प्रवेशानंतर राष्ट्रवादीला ‘अच्छे दिन’ आले असतानाच अवघ्या सव्वा वर्षात आमदार भालके यांचे अकाली निधन झाले. त्यामुळे मतदारसंघाला पोटनिवडणुकीस सामोरे जावे लागले. कोरोना संकटाच्या छायेत झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला आमदार भालके यांच्या पश्चात ही जागा राखता आली नाही. 

अवघ्या सव्वावर्षात राष्ट्रवादी काँग्रेसला पडलेल्या मतात वाढ झाली असली तरी प्रमुख मंत्र्यांच्या सभा होऊनही झालेला पराभव राष्ट्रवादीला जिव्हारी लावणारा ठरला आहे. पंढरपूर पोटनिवडणुकीतील शक्य असणारा विजय पराभवाकडे गेला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी याचे खापर आर्थिक गोष्टींवर फोडले असले तरी प्रत्यक्षात मतदारांनी राष्ट्रवादीच्याच उमेदवाराला मतदान करावे, यासाठी मात्र तितक्याशा नेटाने प्रयत्न झाल्याचे दिसून आलेले नाही.

संत दामाजी साखर कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे हे सलग दोन निवडणुकीच्या अनुभवाच्या जोरावर पोटनिवडणुकीत योग्य नियोजन करुन विजय मिळवला असला तरी विधिमंडळातील कामकाजाचा त्यांना अनुभव नाही. त्यामुळे त्यांना या कामासाठी आमदार प्रशांत परिचारक यांच्यावर अवलंबून राहावे लागत आहे. आमदार परिचारक यांचा हस्तक्षेप मंगळवेढ्यातील काही राजकीय नेत्यांना मान्य नाही. नगरपालिकेच्या आढावा बैठकीत त्याचे पडसाद दिसून आले. 

Post a Comment

0 Comments