औरंगाबाद :
पत्नीसोबत सतत होणाऱ्या वादाला वैतागून तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी रात्री अकराच्या सुमारास उघडकीस आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हडको, एन-१२ भागातील विवेकानंद नगरमधील विशाल हिरालाल खाजेकर (वय, २४) याचा पत्नीसोबत नेहमीच वाद व्हायचा. रविवारी देखील दोघांमध्ये भांडण झाले होते. रागाच्या भरात विशालने गळफास घेतला, ही बाब पत्नीच्या लक्षात येताच तिने विशालला बेशुद्ध अवस्थेत घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी विशाल यांना मृत घोषीत केले.
त्यानंतर त्याच्या पत्नीने सासरच्या मंडळींना घडलेला प्रकार सांगितला व ती घाटीतून निघून गेली, असा आरोप विशालच्या नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात विशालच्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सिडको पोलीस करीत आहेत.
0 Comments