सोने महागले; सोने आणि चांदीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी दरवाढ


बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत  पुन्हा एकदा तेजी दिसून आली आहे. आज सोने ६० रुपयांनी तर चांदी ३०० रुपयांनी महागली आहे. दोन्ही धातूंच्या किमतीत गेल्या आठवड्यात नफावसुलीमुळे घसरण झाली होती.

सध्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये (एमसीएक्स) सोन्याचा भाव ४८५०८ रुपये आहे. त्यात ६० रुपयांची वाढ झाली आहे. एक किलो चांदीचा भाव ७१५४६ रुपये असून त्यात ३९७ रुपयांची वाढ झाली आहे.

आज बुधवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७५९० रुपये (gold silver rate) आहे. मुंबईत २४ कॅरेटचा भाव ४८५९० रुपये आहे. दिल्लीत आजचा २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७६४० रुपये झाला आहे. २४ कॅरेटसाठी सोन्याचा भाव ५१७९० रुपये झाला आहे. आज चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४५७५० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९९०० रुपये आहे. कोलकात्यात आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७६४० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ५१७९० रुपये आहे.

अलीकडच्या आठवड्यांतील स्थिर सुधारणेनंतर यूएस अर्थ धोरणात बदलाच्या अपेक्षेमुळे या सराफा धातूने गेल्या आठवड्यापासून नुकसान दाखवले असल्याचे एंजेल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष प्रथमेश माल्या यांनी सांगितले.

या महिन्याच्या सुरूवातीला सोन्यामध्ये तेजी राहिली कारण जागतिक केंद्रीय बँकेच्या उदार धोरणाने मागणी कायम राहिली. यूएस फेडद्वारे संभाव्य दर वृद्धीच्या चालीमुळे सराफा धातूचे अपील प्रभावित झाले. सट्टेबाजांनी कॉमेक्स गोल्डमधली आपली नेट लॉन्ग पोझिशन कमी केली, तेलाच्या वाढत्या किंमती आणि गुंतवणूकदार जोखीम असणार्‍या संपत्तीकडे वळल्याने सोन्याच्या किंमतीत घट नोंदण्यात आली.


Post a Comment

0 Comments