.....म्हणून भाजपने ‘शवासन’ करावे; संजय राऊत


आज आंतरराष्ट्रीय योगा दिन असल्याने तुम्ही विरोधकांना कोणता योग सुचवाल?, असं संजय राऊत यांना विचारलं असता. संजय राऊत यांनी जाता जाता क्षणार्धात… ‘शवासन’ असं एका शब्दात उत्तर देऊन भाजपला टोला लगावला.

प्रताप सरनाईक त्रासात आहेत, अडचणीत आहेत. त्यांचं कुटुंब अडचणीत आहे. त्याचं कारण पत्रात दिलं आहे. भाजप विनाकारण त्रास देत आहे असं सरनाईक यांनी म्हटलं आहे. पण संपूर्ण शिवसेना सरनाईक यांच्या कुटुंबाच्या पाठिशी उभी आहे, असंही त्यांनी स्पस्ट केले.


आम्ही कोणत्याही प्रसंगाला तोंड देणारे बाळासाहेबांचे शिलेदार आहोत. शिवसेनेसोबत काम करता करता केस पांढरे झाले आहेत आणि परत काळे करत आहोत. आम्हाला सर्व माहिती असून फार तर तुरुंगात टाकाल. तुरुंगात जाण्याची आमची तयारी आहे असेही राऊतांनी म्हंटल.

Post a Comment

0 Comments