दुसऱ्या मुलासोबत बोलताना पाहिले म्हणून प्रियकराने एका अल्पवयीन मुलीला विहिरीत ढकलून खून केल्याची धक्कादायक घटना वर्धा जिल्ह्यातील आर्वीमध्ये घडली आहे. खून केल्यानंतर पाच दिवसांनंतर घटना उघडकीस आली. त्यानंतर या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय आत्राम असं अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. आर्वी शहरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीसोबत त्याचे प्रेमसंबंध जुळले होते.
आरोपी अजयने अल्पवयीन प्रेयसीला भेटण्यासाठी बोलावले होते. यावेळी त्याची प्रेयसी एका मुलासोबत बोलत होती. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यामुळे दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. त्यानंतर रागाच्या भरात अजयने मुलीला जवळच असलेल्या एका विहिरीत ढकलून दिले. त्यानंतर घटनास्थळावरून तो पसार झाला.
0 Comments