"महिलेने पतीसाठी घराचा दरवाजा उघडा ठेवला, शेजाऱ्याने घरात घुसून लैगिंक अत्याचार"



नोएडा : आपल्या पतीसाठी घराचा दरवाजा उघडा ठेवला होता तेव्हा शेजाऱ्याने याचा फायदा उचलत घरात घुसून त्या महिलेवर लैगिंक अत्याचार केला आहे. या महिलेचा पती झोपण्यासाठी छतावर गेला होता. तो रात्री घरात येईल म्हणून महिलेने घराचा दरवाचा उघडा ठेवला होता. मात्र हा दरवाजा उघडा ठेवणे या महिलेला चांगलेच महागात पडले आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी या आरोपीवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या प्रकरणी पीडित महिलेने तिच्या घराशेजारी राहत असलेल्या रिंकू नावाच्या व्यक्तीवर बलात्काराचा आरोप केला आहे.

या महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. रिंकू नावाच्या व्यक्तीने घराचा दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेतला. या व्यक्तीने गुपचूप महिलेच्या खोलीत घुसून तिला मारहाण करत तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून या व्यक्तीला अटक केली आहे.

Post a Comment

0 Comments