बार्शीकर माय-बाप जनतेकडून आमदार राजाभाऊ राऊत यांच्या पाठीवर कौतुकाची थाप



बार्शी/प्रतिनिधी:

बार्शी शहरातील उपळाई रोड येथील पराग इस्टेट या भागातील नागरी समस्या, अडी-अडचणी सोडविल्याबद्दल, त्या भागात १ कोटी, २३ लाख रुपयांची रस्ते खडीकरण डांबरीकरण, गटारीची विकास कामे केल्याबद्दल येथील नागरिक बंधू-भगिनींच्या वतीने आमदार राजाभाऊ राऊत यांचा कृतज्ञता सोहळ्यातून नागरी सत्कार करण्यात आला. 

त्याचबरोबर या ठिकाणी लोकसहभागातून बगीच्या विकसित करण्यात आली. या बगीच्याचा प्रथम वर्धापन दिन केक कापून साजरा करण्यात आला. या कृतज्ञता सोहळ्यात बोलताना आमदार राजेंद्र राऊत यांचे मन भरून आले होते. ते म्हणाले की, समाजकारण व राजकारण करीत असताना केलेल्या कामाची पोचपावती म्हणून ज्यावेळेस अशाप्रकारे नागरिकांकडून कौतुक केले जाते व सत्कार केला जातो अशावेळी केलेल्या कामांचे चीज झाले अशी भावना निर्माण होते. तुमच्याकडून झालेले कौतुक हे आणखी जोमाने कार्य करण्यासाठी बळ देते. या सत्कारामुळे माझ्या खांद्यावर आणखीन जबाबदारी वाढली असून माझ्यासारख्या दिवस-रात्र काम करणाऱ्या कार्यकर्त्याकडून नागरिकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी सतत प्रयत्नशील असून बार्शी शहरातील प्रत्येक गल्लोगल्ली, विस्तारित भाग, अविकसित भाग या ठिकाणी नागरिकांना सोयी-सुविधा देण्यासाठी मी सतत कार्यरत आहे.

बार्शी नगर परिषदेच्या माध्यमातून शहरात काम करीत असताना काही ठिकाणी थोड्या प्रमाणात कामे राहिलेली आहेत. ती कामे मंजूर असून तेही कामे निश्चित पूर्ण केली जातील याची मी खात्री देतो, याबाबत नागरिकांनी कोणताही गैरसमज करून घेऊ नये. आगामी निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांकडून जाणून-बुजून अफवा पसरवून, गैरसमज करण्याचे प्रकार व कट कारस्थाने यापुढे केली जातील. परंतु मला खात्री आहे की बार्शीकर जनता त्यांच्या या कटकारस्थानांना पूर्ण ओळखून असून, त्यांच्या सत्तेच्या १० वर्षाच्या कार्यकाळातील त्यांचा निष्क्रियपणा हा बार्शीकर जनतेस दिसून आलेला आहे. तुम्हां बार्शीकरांचा आमच्यावरील विश्वासाच्या बळावरच आगामी नगरपालिका निवडणुकीत पुन्हा एकदा आपण विजय संपादन करू याची मला पूर्ण खात्री आहे.

यावेळी स्थानिक रहिवासी सौ. कांताताई पाटील, त्र्यंबक गोरे यांनी मनोगत व्यक्त करताना, आमदार राजेंद्र राऊत यांच्या कार्याचे कौतुक करून तुमच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे  उभे राहू अशी ग्वाही दिली.

यावेळी नगराध्यक्ष ॲड आसिफभाई तांबोळी, मुख्याधिकारी सौ अमिता दगडे पाटील, माजी नगराध्यक्ष रमेश पाटील, पक्षनेते विजय नाना राऊत, उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, नगरसेवक विजय चव्हाण,नागजी दुधाळ, सौ.सोनल होनमाने, जि.प. सदस्य मदन दराडे, नगरसेवक दिपक राऊत, संतोष भैय्या बारंगुळे, रितेश वाघमारे, संदेश काकडे, मदन गव्हाणे, विश्वास दादा ठोंबरे, पांडुरंग राऊत, मोहन ठोंगे, विठ्ठल पाटील, प्रकाश देवकते, मुन्ना बागवान, रविंद्र पाटील, मंगेश पवार, आबासाहेब जुंदळे, सागर बगले, गणेश कदम, आप्पा काशिद, गंभीर साहेब, उबाळे सर, लक्ष्मण धाबेकर व पराग रहिवाशी मंडळाचे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ठाकरे सर यांनी केले. प्रास्ताविक श्रीकांत ठोंबरे व आभार प्रदर्शन अजित नवगिरे यांनी केले.

Post a Comment

0 Comments