सोलापूर/प्रतिनिधी:
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी संवाद साधून आमचा हुरूप आणखी वाढला अशी भावना आज सोलापूर जिल्ह्यातील सहा सरपंचांनी व्यक्त केली.
मोहोळ तालुक्यातील आष्टी येथील सरपंच डॉ. अमित व्यवहारे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना गाव कोरोनामुक्त करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठी राज्यातील विविध सरपंचांनी आपआपल्या परीने उपक्रम राबविले आहे. पुणे, नाशिक व कोकण विभागात चांगली कामगिरी करणाऱ्या काही सरपंचाशी आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी संवाद साधला. त्यावेळी सोलापुर जिल्ह्यातील डॉ. व्यवहारे यांनी संवाद साधला.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज आष्टी ता. मोहोळचे सरपंच अमित व्यवहारे, गोपाळपूर ता पंढरपूरचे सरपंच विलास मस्के, चिंचणी ता पंढरपूरच्या सरपंच मुमताज शेख, जकापूर ता अक्कलकोटच्या सरपंच दिपाली आळगी, आंधळगाव ता मंगळवेढाचे सरपंच शांताबाई भाकरे, रहाटेवाडी (ता. मंगळवेढा) वर्षाराणी गोपाळ पवार उपस्थित होते.
0 Comments