अभिनेत्री यामी गौतम अडकली विवाह बंधनात, ‘उरी’च्या दिग्दर्शकासोबत उरकली लगीनघाई!


    
मुंबई : बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री यामी गौतम हिने गुपचूप लग्न गाठ बांधली आहे. अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करत तिने तिच्या चाहत्यांसह ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. यामी गौतमने आदित्य धरसोबत लग्न केले आहे. आदित्य धर (Aditya Dhar) यामी गौतम अभिनित ‘उरी’ या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे. या चित्रपटात अभिनेत्रीबरोबर विक्की कौशलदेखील मुख्य भूमिकेत दिसला होती.

ज्यात आता यामी गौतमच्या नावाचाही समावेश झाला आहे. त्यानंतर आता यामी गौतमने देखील लग्न केले आहे. यामी या वधू वेशामध्ये खूपच सुंदर दिसत आहे.  अभिनेत्रीचे चाहते देखील तिच्या या सोशल मीडिया पोस्टवर सतत अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.

 २०१५ मध्ये आलेल्या बदलापूर सिनेमात आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्यानंतर मग तिची काबील सिनेमातील अंध महिलेची भूमिकाही गाजली. मात्र यामी गौतमला ग्लॅमर मिळवून दिलं ते म्हणजे २०१९ मध्ये आलेल्या उरी द सर्जिकल स्ट्राईक  या सिनेमाने. याच सिनेमाच्या निमित्ताने दिग्दर्शक आदित्य धर आणि यामी गौतम एकमेकांना भेटले. त्यांची मैत्री वाढत गेली आणि यामीला ग्लॅमरसोबत आदित्यच्या निमित्ताने लाईफ पार्टरनही मिळाला

Post a Comment

0 Comments