खूशखबर! केंद्र सरकार देत आहे २ लाख रुपयांच बक्षिस




केंद्र सरकार (Central Government) लोकांना खासकरुन तरुणांना २ लाख रुपये जिंकण्याची संधी देत आहे.तुम्हाला एका स्पर्धेत (prize) सहभागी व्हावं लागणार आहे.

सरकारने लोकांनी तंबाखू (Tobacco) सेवन करू नये, याबाबत जागरुकता पसरावी यासाठी एका स्पर्धेचं आयोजन केलं आहे. अशा अनेक स्पर्धांचं आयोजन सरकारकडून केलं जातं.

सरकारने एका अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्वीट (twitter post) करत याबाबत माहिती दिली आहे. २ लाख जिंकण्यासाठी तुम्हाला एका स्पर्धेत सहभागी व्हावं लागेल. जाणून घ्या या स्पर्धेविषयी…

तुमच्याकडे जर शॉर्टफिल्म बनवण्याची (Short-film Contest) कला असेल, तर ही स्पर्धा तुमच्यासाठी आहे. आंतरराष्ट्रीय तंबाखू निषेध दिवस २०२१ या दिवसानिमित्त तुम्हाला तंबाखूच्या दुष्पपरिणामांबाबत शॉर्टफिल्म बनवावी लागेल. ही शॉर्टफिल्म कमीतकमी ३० सेकंद आणि जास्तीत जास्त ६० सेकंद असावी लागेल.

आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे कर्मचारी आणि त्यांचे नातेवाईक वगळता १८ वर्षांपेक्षा जास्त वयाचे सर्व नागरिक/भारतीय नागरिक (३१ मे २००३ रोजी किंवा त्यापूर्वी जन्मलेले) या स्पर्धेत भाग घेऊ शकतात.

काय आहे बक्षिसाची (prize)  रक्कम?

1st Prize: २,००,०००/-
2nd Prize: १,५०,०००/-
3rd Prize: १,००,०००/-
उत्तेजनार्थ पुरस्कार- १०,००० रुपये दहा व्यक्तींना देण्यात येतील.

या लिंकवर करा क्लिक

तुम्हाला अधिक माहिती https://www.mygov.in/task/short-film-making-contest या वेबसाइटवर मिळेल.

या आहेत महत्त्वाच्या तारखा

स्पर्धा सुरू झाल्याची तारीख- ३१ मई, २०२१

शेवटची तारीख- ३० जून, २०२१


Post a Comment

0 Comments