परंडा तालुक्यातील कांदलगाव मधील युवा सामजिक कार्यकर्ते मगनदास बापू पवार यांचा आज वाढदिवस, तसं तर ह्या माणसाचं आयुष्य खाचखळग्यानी भरलेलं पण कधी तक्रार नाही. मात्र समाजसेवेचे वृत्त कधी सोडले नाही, अखंडपणे काही ना काही करत गुंतत राहणे हा त्याचा स्थायीभाव. त्यामुळे गावांत तरुणांची मोट बांधत राजकारणात एन्ट्री केली. गावांतील सर्वात तरूण महिला सरपंच म्हणून त्याच्या पत्नी भाग्यश्री मगनदास पवार निवडुन आल्या.
पत्नी सरपंच म्हंटल्यावर गावांत रुबाबात न गावासाठी काहीतरी वेगळे केले पाहिजे या विचाराने प्रेरित होऊन निवडून आल्यापासून गावांत विकासकामांचा झपाटा लावला आहे. सतत आपण गावासाठी काहीतरी वेगळं केलं हाच डोक्यात विचार. "साधी राहणी, उंच विचारसरणी" या तत्वाने जगत असलेला तरुण येत्या काळात पंचक्रोशीतील मोठा नेता झाल्याशिवाय राहणार.
शांत, संयमी, सुसंस्कृत स्वभावाचे लोकांना ते लगेच आपलेसे करून घेतात, "पद आज उद्या नाही" आपण आपली तत्व का सोडायची! कोरोना काळात त्यांनी केलेले काम नक्कीच आखण्याजोगे आहे. कोरोना प्रतिबंध करण्यासाठी विविध उपाययोजना करुन गाव कोरोना मुक्त केले.
0 Comments