करमाळा! मूख्याधिकारी वीणा पवार यांच्यावर कारवाई संदर्भात पालकमंत्री यांची नागेश कांबळे यांनी घेतली भेट



करमाळा/प्रतिनिधी ;

मंडलिक यांच्या मृत्यु संदर्भात जो बेजबाबदारपणा प्रशासनाने दाखवला. त्यास केवळ प्रशासन प्रमूख म्हणून मूख्याधिकारीच जबाबदार आहेत. त्यामूळे त्यांच्यावर सदोष मधूष्यवधाचा गून्हा दाखल करण्यासंबंधी वरिष्ठ पातळीवर चौकशी करावी. अशी मागणी रिपाई(आ.) चे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष नागेशजी कांबळे तसेच "बहूजन हक्क अभियान" चे संस्थापक अॅड.दयानंद बनसोडे यांनी सोलापूर येथे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केली.

यावेळी पोलिस अधिक्षक यांच्या कार्यालयास देखील प्रत्यक्ष भेट देऊन निवेदन दिले. याप्रसंगी बहूजन हक्क अभियानचे जिल्हाध्यक्ष राजू चव्हाण सर, सागर वाघमारे, मयत मंडलिक यांचे चिरंजीव अभिजीत मंडलिक तसेच प्रफुल्ल दामोदरे ,शरद पवार ,सूरेश खरात इ. कार्यकर्ते उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments